ओडिशामधून एक भीषणअपघात समोर आला आहे. यामध्ये एका भऱधाव एसयूव्ही कारने दोन मोटारसायकल आणि एक एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात सात लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ओडिशा राज्यातील कोरापुट जिल्ह्यात घडली. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सिंगल लेनवर झाला अपघात -
सीसीटीव्ही फुटेजनुसार, सिंगल लेन रस्त्यावर एक एसयूव्ही भरधाव वेगाने येताना दिसत आहे. एसयूव्ही ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्यासाठी पुढे येताच रस्त्याच्या मध्यभागी आलेल्या दोन मोटारसायकलींना एसयूव्हीने धडक दिली.
तीन जणांचा जागीच मृत्यू -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव एसयूव्हीने दोन बाइक आणि एका रिक्षाला धडक दिली. अपघातानंतर रिक्षा व एसयूव्ही रस्त्याकडेला असणाऱ्या शेतात जाऊन उलटली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना या अपघातातील मृतांच्या वारसांना ३-३ लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.