Viral News: बदलत्या काळानुसार बाजारात नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. कोण काय बनवेल, याचा नेम नाही. मात्र, यात अशा काही गोष्टीं असतात, ज्याचा कदाचित कोणी विचार केला असेल. काही दिवसांपूर्वीच चहा फिल्टरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो हुबेहूब खिळ्यासारखा तयार करण्यात आला होता. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. पावसाळ्यात अनेकदा आपला मोबाईल भिजतो आणि खराब होतो. ज्यामुळे मोबाईल खराब होण्याची शक्यता आहे. मात्र, मोबाईल भिजू नये म्हणून बाजारात छत्री आली आहे, जी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
तुम्ही आजपर्यंत अनेक प्रकारच्या छत्र्या पाहिल्या असतील आणि त्याचा वापरही केला असेल. पण कधी मोबाईलसाठी बनवलेली छत्री पाहिलीत का? पण आता अशी छत्री सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक व्यक्ती त्याच्याजवळील छोटी छत्री उघडून दाखवतो. त्यानंतर फोनच्या मागच्या बाजूला चिटकवतो. या छत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी चकीत झाले आहेत.
@AnitaPuniya नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आता मोबाइलसाठीही छत्री आली आहे. या वेळी मी हेच विकत घेईन.’ आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, ‘काय होत आहे?’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘आता हे नक्कीच घ्यावे लागेल.’ तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘हे खरे आहे की, आता पावसात फोन भिजणार नाही.’
काही तासांपूर्वी सोशल मीडियावर आयोफोन दिसणार लग्नपत्रिका व्हायरल झाली. ही लग्नपत्रिक पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. या लग्नपत्रिकेच्या पुढच्या बाजूला वधू-वरांच्या फोटोसह लग्नाची तारीख लिहिली आहे. लग्नपत्रिकेच्या आत दिलेली माहिती व्हॉट्सॲपच्या डिझाइनमध्ये दिलेली आहे. गुगल मॅपच्या लूकमध्ये लग्नाचे लोकेशन दिले आहे. या लग्नपत्रिकेला आयफोनचा रियर बॉडी लूक देण्यात आला आहे. Laxman_Weddingcards नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्यानंतर काही क्षणातच हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नपत्रिकेची ही डिझाइन अनेकांना आवडली आहे.
संबंधित बातम्या