Viral Video: समोसा हा अनेकांच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे. मात्र, हा समोसा अनेकांच्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतो, याची कोणीही कल्पना केली नसेल. उल्हासनगर पूर्वेतील एका दुकानातील समोसा बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कामगार पायाने तुडवत पीठ मळत आहे. हा किळसवाणा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त केला जात आहे.
उल्हासनगरमधील शहरपूर्व आशाळेगाव येथील एका मिठाईच्या दुकानातील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओत एका पत्र्याच्या शेडमध्ये एक कामगार चक्क पायाने पीठ मळत असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हेतर, अस्वच्छ जागेत समोसासाठी पीठ मळले जात आहे. असे समोसे खाल्ल्याने जुलाब, उलटी, टायफाइड, कावीळ, अन्न विषबाधा इत्यादी आजार होऊ शकतात.
व्हायरल व्हिडिओतील दुकान १५ ते २० वर्षे जुने आहेत. या दुकानात समोसे, कचोरी, वडापाव, ढोकला आदी खाद्यपदार्थ विक्रीसाठी असतात. जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या वेशीवर हे एकमेव गोड पदार्थ विकणारे दुकान असल्याने अख्खे आशळे गाव या दुकानातून मिठाईची खरेदी करते.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले. यामुळे कानदाराने सोमवार रात्री पासून बंद केल्याची माहिती आहे. याबाबत विठ्ठलवाडी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मंगळवारी आशेळेगाव येथील हरिओम मिठाईच्या दुकानाची पाहणी करून विभागा अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले.
संबंधित बातम्या