Zelenskyy gets big support from Europe : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर अनेक युरोपीय देश युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. ब्रिटन आणि फ्रान्स हे दोन्ही देश युक्रेनसोबत शस्त्रसंधी योजनेवर काम करण्यास तयार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान केरी स्टार्मर यांनी युक्रेनला पाच हजार संरक्षण क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी १.६ अब्ज पौंडची (सुमारे २ अब्ज अमेरिकन डॉलर) मदत देणार असल्याचे जाहिर केले आहे. अशा तऱ्हेने युक्रेनला युरोपचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. ओव्हल हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिका उघडपणे रशियासोबत येऊ शकते आणि अशा परिस्थितीत झेलेंस्कीसाठी ते अवघड जाईल, असे मानले जात होते. मात्र, आता युक्रेनच्या मदतीसाठी युरोपीय देश सक्रिय झाले आहे.
स्टार्मर म्हणाले की, ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन यांनी शस्त्रसंधी योजनेवर एकत्र काम करण्यास सहमती दर्शविली आहे, जी आता अमेरिकेसमोर सादर केली जाईल. युद्ध संपवण्याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी युरोपियन नेत्यांसोबत होणाऱ्या शिखर परिषदेपूर्वी स्टार्मर बोलत होते. स्टॉर्मर म्हणाले की, चार देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ही योजना आली आहे. पण रविवारी युरोपियन नेत्यांच्या शिखर परिषदेत ओव्हल ऑफिसंनधे झालेल्या वादाचा प्रभाव होता.
शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यावर आपला भर असल्याचे स्टार्मर यांनी सांगितले. स्टार्मर आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर माझा विश्वास नाही, पण ट्रम्प यांच्यावर माझा विश्वास आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनाही कायमस्वरूपी शांतता हवी आहे. अशा तऱ्हेने अमेरिकेकडून सुरक्षेची हमी मिळण्याची चर्चा सुरू आहे. जर करार करायचा असेल, लढाई थांबवायची असेल तर त्या कराराचा बचाव करावा लागेल, कारण सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तात्पुरती शस्त्रसंधी होईल आणि मग रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुन्हा येतील. हे यापूर्वीही घडले आहे, मला वाटते, हा खरा धोका आहे आणि म्हणूनच जर करार झाला तर तो तात्पुरता युद्धविराम नसून कायमस्वरूपी करार आहे याची खात्री करावी लागेल. '
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी युक्रेन आणि रशियायांच्यातील युद्ध संपवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, इटली, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, स्पेन, कॅनडा, फिनलँड, स्वीडन, चेक प्रजासत्ताक आणि रोमानिया या देशांचे नेतेही या परिषदेत सहभागी होणार आहेत. तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री, नाटोचे सरचिटणीस आणि युरोपियन कमिशन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्षही या परिषदेत सहभागी होत आहेत.
अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये दाखल झालेल्या व्होलोदिमीर झेलेन्स्की यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पीएम स्टार्मरने त्यांना मिठी मारली. शनिवारी १० डाउनिंग स्ट्रीट येथील ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात लेन्स्की पोहोचताच बाहेर जमलेल्या जमावाने त्यांच्या बाजूने घोषणाबाजी केली. लंडनमध्ये युरोपियन नेत्यांच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला दोन्ही नेत्यांची भेट झाली. अमेरिकेने युक्रेनचा पाठिंबा काढून घेतल्यास युरोपीय देश युक्रेन आणि स्वत:चे संरक्षण कसे करू शकतात, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. स्टार्मर यांनी युद्धग्रस्त देशाच्या नेत्याला सांगितले की, "बाहेर रस्त्यावर घोषणा ऐकताच तुम्हाला संपूर्ण ब्रिटनमध्ये पाठिंबा आहे. युद्धाला कितीही वेळ लागला तरी आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, असे ते म्हणाले. झेलेन्स्की यांनी ब्रिटनच्या जनतेचे ही आभार मानले.
संबंधित बातम्या