ukraine russia war updates : यूक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू युद्ध दिवसेंदिवस भयंकर होत चालले आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतीच पाश्चिमात्य देशांना इशारा दिला होता की, जर त्यांनी युद्धात यूक्रेनला मदत करणे सुरूच ठेवल्यास त्यांच्या देशात घुसून हल्ले केले जातील. दरम्यान यूक्रेनने पुतीन यांना मोठा झटका दिला आहे. युक्रेनच्या नौदलाने अब्जावधी किमतीची रशियन युद्धनौका काळ्या समुद्रात नष्ट केली आहे. यूक्रेनने वॉरशिप उध्वस्त केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यूक्रेनने दावा केला आहे की, त्यांनी नौसैनिक ड्रोनच्या मदतीने रशियाची गस्तीची युद्धनौका नष्ट केली आहे.
न्यूज वीकच्या रिपोर्टनुसार, यूक्रेनच्या लष्कराने मंगळवारी दावा केला आहे की, त्यांच्या नौसैनिक ड्रोनच्या सहाय्याने काळ्या समुद्रात रशियन नौदलातील गस्ती नौका नष्ट केली आहे. हे वृत्त यूक्रेनच्या संरक्षण मंत्रालय (एचयूआर)च्या मुख्य गुप्तचर संचलनालयाने दिले आहे.
यूक्रेनच्या सैन्याने काळ्या समुद्रात नष्ट केलेल्या रशियन जहाजाची ओळख ६५ मिलियन अमेरिकी डॉलर किमतीच्या सर्गेई कोटोवच्या रुपात झाली आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अन्य एका रशियन जहाजाला नष्ट केले आहे.रात्रीच्या वेळी@DI_Ukraine ग्रुप१३ च्या विशेष पथकाने६५ मिलियन डॉलर किमतीचे "सर्गेई कोटोव" जहाजावर हल्ला केला. ड्रोन हल्ल्यात"सर्गेई कोटोव" जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यानंतर सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर पोस्ट केल्या गेलेल्या एका व्हिडिओत दावा करण्यात आला की, यूक्रेनच्या नौदलाने सर्गेई कोटोव जहाजाला काळ्या समुद्रात बुडवले.
संबंधित बातम्या