मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले, प्रमुख शहरांवर बॉम्बवर्षाव

Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले, प्रमुख शहरांवर बॉम्बवर्षाव

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 16, 2022 05:12 PM IST

Ukraine Russia war update : रशियाने युक्रेनवर पुन्हा पूर्ण शक्तीनिशी क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत. काळ्या समुद्रातून युक्रेनवर जवळपास ६० क्षेपणास्त्रे डागली आहेत.

रशियाकडून युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले
रशियाकडून युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले

Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. शुक्रवारी राजधानी कीवमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. याशिवाय युक्रेनच्या इतरही अनेक भागांना रशियन सैन्याने हल्ले केले आहेत. रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याने युक्रेनमध्ये हाहाकार उडाला आहे. रशियाने ब्लॅक सीवरून युक्रेनवर किमान ६० क्रूज मिसाइल डागली आहेत. आता युक्रेनमध्ये चहूबाजूंना स्फोटांचा आवाज येत आहे. या हल्ल्यानंतर कीवसह अनेक शहरांमध्ये ब्लॅक आउट झाला आहे. लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी स्थानकांचा आसरा घेतला आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या सैन्याने पुन्हा एकदा युक्रेनच्या भूमीवर हल्ला चढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपासून कीवसह युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. रशियन हल्ल्यावर, महापौरांनी विधान केले की हवाई हल्ल्यानंतर कीव आणि खारकीवसह अनेक शहरांमध्ये ब्लॅक आउट झाला आहे. कीवमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. हल्ल्यांपासून वाचण्यासाठी लोकांनी स्थानकांवर आश्रय घेतला आहे.

तत्पूर्वी, रशियाच्या राज्य TASS वृत्तसंस्थेने शुक्रवारी सांगितले की, युक्रेनच्या रशियन-नियंत्रित लुहान्स्क प्रदेशातील लॅन्ट्राटिव्हका गावात युक्रेनियन सैनिकांच्या गोळीबारात किमान आठ लोक ठार आणि २३ जण जखमी झाले आहेत.

हल्ल्याच्या १० महिन्यांनंतर पुतिन बेलारूसला देणार भेट -

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सोमवारी बेलारूसला भेट देणार आहेत आणि त्यांचे समकक्ष आणि सहयोगी अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी चर्चा करणार आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या १० महिन्यांनंतर पुतिन यांचा दौरा होत आहे. 

नवीन वर्षासाठी रशिया धोकादायक नियोजन -
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भात रशियाने नवीन वर्षासाठी नवीन योजना ठरवली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत रशिया आपल्या अनेक शहरांमध्ये २ लाखांहून अधिक सैनिक तैनात करू शकतो, असा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. युक्रेनचे म्हणणे आहे की, रशिया नवीन वर्षाच्या दिवशी सामान्य युक्रेनियन नागरिकांवर अत्याचार करण्याचा कट रचत आहे. 

WhatsApp channel

विभाग