मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर! रशियाला इराण पुरवणार ड्रोन, तर US-जर्मनी यूक्रेनला देणार रणगाडे

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर! रशियाला इराण पुरवणार ड्रोन, तर US-जर्मनी यूक्रेनला देणार रणगाडे

Feb 06, 2023 06:24 PM IST

UkraineRussiawar : जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असून इराण रशियाच्या मदतीला धावला आहे. दुसरीकडे अमेरिका व जर्मनीने युक्रेनला युद्ध रणगाडे पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी कधीही पडू शकते.

Ukraine Russia war
Ukraine Russia war

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र हा संघर्ष संपण्याऐवजी अधिकच वाढताना दिसत आहे. जगातील विविध देश ज्या प्रकारे मॉस्को आणि कीव यांच्या पाठीशी उभे आहेत, ते पाहता महायुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे. इराण आणि रशियामधील संरक्षण सहकार्य पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होत आहे. अहवालानुसार व्लादिमीर पुतिन तेहरानमध्ये एक कारखाना तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहेत जिथे दरवर्षी सुमारे ६ हजार इराणी ड्रोन बनवता येतील. यावर पाश्चिमात्य देशांचा पारा चढला असून रशियाने सर्व मर्यादा  ओलांडल्याचा इशारा देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ड्रोन बनवण्यात गुंतलेल्या ८ इराणींवर अमेरिकेने निर्बंध जाहीर केले आहेत. रशियाकडून युक्रेनमध्ये कहर करण्यासाठी सातत्याने घातक कामिकाझे ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. रविवारी रात्रीच युक्रेनच्या अनेक भागात हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले. देशाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. 

जर्मनी युक्रेनला देणार लेपर्ड टँक - 
दुसरीकडे जर्मनीने युक्रेनला लेपर्ड टँक देण्याची घोषणा केली आहे. जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी घोषणा केली की त्यांचे सरकार युक्रेनला 'लेपर्ड २' युद्ध रणगाडे देईल. त्यासाठी इतर देशांचे आवाहन मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जर्मन सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की ते सुरुवातीला युक्रेनला त्याच्या साठ्यातून Leopard 2 A6 टँकची एक कंपनी देईल,  ज्यामध्ये १४ वाहने असतील. जर्मनी आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडून युक्रेनला ८८ टँक पुरवणे हा त्याचा उद्देश आहे. युक्रेनला आमच्या क्षमतेनुसार मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्कोल्झ यांनी बर्लिनमधील कॅबिनेट बैठकीनंतर सांगितले.

यूक्रेनला विशेष प्रकारचे बॉम्ब देणार US -

अमेरिकेने युक्रेनला दूरच्या लक्ष्यांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेले बॉम्ब देण्याचेही मान्य केले आहे. जवळपास वर्षभरापासून रशियाच्या आक्रमकतेचा सामना करत असलेल्या युक्रेनने आपला भूभाग परत घेण्यासाठी कारवाई तीव्र केली आहे. अशा परिस्थितीत हे बॉम्ब त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. यूएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, यूएस $ २.१७ अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजचा भाग म्हणून 'ग्राउंड लॉन्च्ड स्मॉल डायमीटर बॉम्ब' प्रदान करेल. समर्थन पॅकेजमध्ये प्रथमच सर्व भिन्न हवाई संरक्षण प्रणालींना जोडणारी उपकरणे देखील समाविष्ट आहेत. अनेक महिन्यांपासून, युक्रेनला बॉम्ब देण्यास अमेरिकन अधिकारी नाखूष आहेत, कारण त्यांचा वापर रशियाच्या काही भागांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो, या भीतीने संघर्षाची ठिणगी पडू शकते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग