मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  यूक्रेनची राजधानी कीव शहरात हेलिकॉप्टर कोसळले, गृहमंत्र्यांसह १६ जणांचा मृत्यू

यूक्रेनची राजधानी कीव शहरात हेलिकॉप्टर कोसळले, गृहमंत्र्यांसह १६ जणांचा मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 18, 2023 03:28 PM IST

युक्रेनची राजधानी कीवमध्ये हेलिकॉप्टर कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये युक्रेनचे गृहमंत्र्यांचाही समावेश आहे.

कीव शहरात हेलिकॉप्टर कोसळले
कीव शहरात हेलिकॉप्टर कोसळले

यूक्रेनची राजधानी कीव शहराच्या बाहेर झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत यूक्रेनच्या इंटीरियर मिनिस्टर (गृहमंत्री) सह १६ जणांचा मृत्यू झाला.दुर्घटनेत यूक्रेनचे मंत्री व अन्य अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय पोलीस प्रमुख इगोर क्लेमेंको यांनी म्हटले की, एकूण १६ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये गृहमंत्री व त्यांचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये मंत्री डेनिस मोनास्टिर्स्की यांचाही समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन मुले सामील आहेत. यापूर्वी कीव क्षेत्रीय प्रशासनाचे प्रमुख ओलेक्सी कुलेबा यांनी म्हटले की, ब्रोवेरी शहरात एक हेलिकॉप्टर एक रहिवाशी इमारतीजवळ कोसळले.

फेब्रुवारी महिन्यात व्लादिमीर पुतिन यांनी आक्रमण केल्यानंतर रशिया आणि यूक्रेनने ब्रोवेरीच्या नियंत्रण रेषेवर लढाई लढली होती. एप्रिलच्या सुरूवातीला रशियन सैनिक ब्रोवेरीतून मागे हटले होते.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग