russia ukraine war : रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन तब्बल दोन वर्ष होत आले आहे. हे युद्ध गंभीर टप्प्यावर पोहोचले आहे. यूक्रेनने रशियावर आता पर्यंतंचा सर्वात भीषण प्रतीहल्ला केला आहे. सुमारे १००० युक्रेनियन सैनिकानी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून थेट रशियाच्या कुर्क प्रदेशात प्रवेश केले आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियाने डागलेले सर्व २७ लढाऊ ड्रोन देखील पाडले आहेत. युक्रेनच्या हवाई दलाने शुक्रवारी ही माहिती दिली. दरम्यान, युक्रेनच्या या हल्ल्यामुळे रशियाने कुर्क भागात आणीबाणी जाहीर केली आहे.
युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यापासून यूक्रेनचा हा रशियन भूमीवरील सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. शेकडो युक्रेनियन सैनिकांनी चार दिवसांपूर्वी सीमापार हल्ला केला आहे. रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियन विमानाने डागलेल्या क्षेपणास्त्राने आदल्या दिवशी युक्रेनियन शॉपिंग मॉलला जमीनदोस्त झाले आहे. या हल्ल्यात किमान ११ नागरिक ठार झाले आहेत. तर ४४ जण जखमी झाले आहेत. हे क्षेपणास्त्र युक्रेनच्या पूर्वेकडील डोनेस्तक भागातील कोस्तियानतिनिव्हका येथील निवासी भागात असलेल्या मॉलवर पडले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही रशियन क्षेपणास्त्राने तेथील एका बाहेरच्या बाजारपेठेला लक्ष्य केले होते, त्यात १७ जण ठार झाले होते.
दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, युक्रेनच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अतिरिक्त सैन्य कुर्क प्रदेशात पाठवले जात आहे. आरआयए-नोवोस्ती या वृत्तसंस्थेने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, रशिया कुर्क प्रदेशात अनेक रॉकेट लाँचर्स, तोफांच्या तोफा, ट्रेलर्सवर पाठवल्या जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले जात आहे.
"कुर्स्क प्रदेशातील परिस्थिती कठीण आहे," कुर्कचे कार्यवाहक गव्हर्नर अलेक्सी स्मरनोव्ह यांनी टेलिग्रामवर सांगितले. रशियन संरक्षण मंत्रालयाने सीमेपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुड्झाच्या पश्चिम सीमेवर भीषण लढाईची होत असल्याचं सांगितल आहे. या शहरात रशियाची एक महत्त्वाची नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या पाइपलाइन केंद्र आहे.
दुसरीकडे, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी, मॉस्कोच्या नैऋत्येस सुमारे ५०० किलोमीटर (३२० मैल) अंतरावर केलेल्या या हल्ल्याबाबत बोलण्यास नकार दिला आहे, परंतु युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या एका सल्लागाराने सांगितले की, सीमावर्ती भागावरील हल्ल्यामुळे रशियाला धोका निर्माण झाला आहे. हे लक्षात घ्या की युद्ध आता हळूहळू रशियन भूमीत सरकत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की रशिया फेडरल स्तरावर आणीबाणीची घोषित करतो जेव्हा ५०० पेक्षा जास्त नागरिक ठार झालेले असतात किंवा ५०० दशलक्ष रूबल (सुमारे ६ दशलक्ष डॉलर्स) पेक्षा जास्त नुकसान होते. कुर्स्कमधील लढतीने रशियन माध्यमांचे तसेच जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुर्कच्या लढाईच्या बातम्या रशियन माध्यमांमध्येही दाखवल्या जात आहेत.