Viral News: ब्रिटनमधील काही महिलांनी आपल्या मैत्रिणीच्या उपचारासाठी न्यूड फोटोशूट केले आहे, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. जेसिका रिग्स नावाची एक महिला कॉर्नवॉलमधील सॉल्टॅश येथील रहिवासी असून ती एका दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. शस्त्रक्रियेसाठी पैसे नव्हते म्हणून तिने कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट केले. या शस्त्रक्रियेसाठी पैसा गोळा करण्यासाठी जेसिकाच्या मैत्रिणींनी देखील न्यूड फोटोशूट केले. अशा प्रकारे त्यांनी सुमारे ३२ हजार डॉलर म्हणजेच २७.१५ लाख रुपये जमा केले. जेसिकाने शस्त्रक्रिया न केल्यास तिला अर्धांगवायू धोका आहे, असे तिच्या डॉक्टरांनी सांगितले.
जेसिका रिग्जने दिलेल्या माहितीनुसार, ‘मला पाहिल्यानंतर कोणालाही वाटणार नाही की, मी एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. तुम्हाला वाटेल की, मी पूर्णपणे ठीक आहे. पण, तसे नाही. मी २२ वर्षांची असताना पहिल्यांदा मला एका गंभीर आजाराची लक्षणे जाणवली. कालांतराने आजार वाढतच गेला. परिस्थिती अशी झाली की, मला करिअर सोडून आपल्या घरी रिकामे बसावे लागले. डॉक्टरांनी मला शक्य होईल तितक्या लवकर शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. या शस्त्रेक्रियेसाठी लाखो रुपयांची गरज होती. त्यावेळी माझ्या एका मैत्रिणीने मला कॅलेंडरसाठी फोटोशूट करण्याची कल्पना दिली. मलाही ही कल्पना आवडली आणि मी देखील कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट करण्यास सुरुवात केली’, असे तिने म्हटले. महत्त्वाचे म्हणजे, जेसिका आणि तिच्या मैत्रिणींनी कॅलेंडरसाठी केलेले फोटोशूट अद्याप प्रकाशित झालेले नाही. पुढील वर्षी जानेवारीत ते समोर येतील. मात्र, याआधी काही फोटो समोर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
दरम्यान, पुढील वर्षी १६ जानेवारीला बार्सिलोना येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे रिग्स यांनी सांगितले. डॉक्टर म्हणतात की, उपचार नक्कीच होतील. मात्र, आता या आजाराची लक्षणे दिसणे बंद होईल, याची शाश्वती नाही. दिलासादायक बाब म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर हा आजार वाढण्यापासून रोखता येतो. यामुळे अर्धांगवायू होण्याचा धोका कमी होईल. जेसिका यांच्या मैत्रिणींनी जगासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. एका गंभीर आजाराशी झुंजत असलेल्या मैत्रिणीला वाचण्यासाठी आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी त्यांनी थेट कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. या महिलांचे जगभरातून कौतूक केले जात आहे.
संबंधित बातम्या