UK News: एका कंपनीत एक तरुणी सर्वात तरुण कर्मचारी म्हणून काम करू लागली, पण काही दिवसांनी कंपनीने तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या तरुणीला नोकरीवरून का काढले? यामागचे कारण समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. याप्रकरणी तरुणीने कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली. कंपनीने न्यायालयासमोर अनेक स्पष्टीकरणे दिली. परंतु, कोर्टाने त्यांचे काहीच ऐकले नाही आणि तरुणीला ३० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
एलिझाबेथ बेनासी असे या तरुणीचे नाव आहे. एलिझाबेथ हिने २०२२ मध्ये मॅक्सिमस यूके सर्व्हिसेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. एलिझाबेथने सांगितले की, कंपनीचा ड्रेस कोड आहे, हे तिला माहित नव्हते आणि स्पोर्ट्स शूज घातल्याने तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यामुळे कंपनीला नुकसान भरपाई म्हणून तिला ३० लााख रुपये द्यावे लागले.
एलिझाबेथने म्हणाली की, कंपनीत ती एकटीच नव्हती की, जिने स्पोर्ट्स शूट घातले होते. इतरही लोक स्पोर्ट्स शूज घालून आले होते. परंतु, त्यांच्याविरोधात कोणतीही अॅक्शन घेण्यात आली नाही. तिला अयोग्यरित्या लक्ष्य करण्यात आले, असेही तिने म्हटले. यानंतर एलिझाबेथने कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. एखाद्या लहानमुलासारखे तिच्यासोबत व्यवहार करण्यात आला, असाही तिने आरोप केला.
कंपनीने आपल्या स्पष्टीकरणात असे म्हटले की, एलिझाबेथला केवळ तीन महिन्यांसाठी कामावर ठेवण्याचा करार करण्यात आला होता. त्यामुळेच तिला कामावरून काढून टाकण्यात आले. ती सर्वात तरुण कर्मचारी होती, म्हणून तिला 'मायक्रोमॅनेज'केले जात होते. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दक्षिण लंडनमधील क्रॉयडन येथील कामगार न्यायालयाने एलिझाबेथ बेनासी यांच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने निकाल देताना असे म्हटले आहे की, कंपनीने या तरुणीला फक्त तीन महिन्यासाठी नोकरी घेतले असते तर, ईमेलमध्ये त्याचा उल्लेख केला असता. याप्रकरणी न्यायालयाने २९ हजार १८७ पौंड नुकसान भरपाई मागितली आहे.
संबंधित बातम्या