Viral Story: कधी कधी लोकांसोबत अशा घटना घडतात, ज्याची त्यांना कल्पना नसते. एका महिलेसोबतही अशीच एक घटना घडली. महिलेच्या मृत पतीने तब्बल ६४ वर्षांपूर्वी तिच्यासाठी लिहिलेले प्रेमपत्र सापडले आहे.हे प्रेमपत्र सापडल्यानंतर महिले ते वाचले. मात्र, त्यानंतर तिला अश्रू अनावर झाले. हे संपूर्ण प्रकरण इंग्लंड येथील असल्याचे बोलले जात आहे. महिलेच्या पतीने हे प्रेमपत्र भिंतीत वॉलपेपरच्या मागे लपवले होते.
वॉल उर्फ रोज असे या महिलेचे नाव असून ती इंग्लंडमधील डेव्हॉनची रहिवासी आहे. रोजने तिच्या नातावाच्या खोलीसाठी संपूर्ण घराचे काम काढले होते. यावेळी घरातील एका भिंतीचे काम काढले असता एक पत्र सापडले. या पत्रावर तिचे नाव आणि हृदयाचे चित्र दिसले. हे पत्र तब्बल ६४ वर्षांपूर्वी तिच्या पतीने लिहिले होते. महत्त्वाचे म्हणजे, वॉलपेपर काढताच भिंतीवर वॉल असे नाव लिहिलेले दिसले. या पत्रात अतिशय प्रेमळ आणि भावनिक गोष्टीही लिहिल्या होत्या. हे प्रेमपत्र वाचताच वॉल यांना रडू कोसळले.
एका मीडिया रिपोर्टनुसार, वॉल आणि केन पेरोटची १९५९ साली एक्समाउथमधील रीगलमध्ये भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. काही दिवसानंतर दोघांचा साखरपुडा झाला. १९६० मध्ये केन पेरोटने मार्च १९६१ साली एकमेकांशी लग्न केले. मात्र, १९९६ मध्ये केनचा मृत्यू झाला.यानंतर वॉलने त्याला तिच्या आठवणींमध्ये जिवंत ठेवले.