Viral News: एका रेस्टॉरंटमधून आणलेली बटर चिकन करी खाल्ल्याने इंग्लंडमधील एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. बटर चिकन खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा होऊ शकतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जोसेफ हिगिन्सन असे मृत्यू झालेल्या तरुणाचे आहे. त्याचा मृत्यु कशामुळे झाला? यामागचे खरे कारण समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोसेफ हिगिन्सन हा ग्लंडमधील ग्रेटर मँचेस्टरमधील बरी येथील रहिवासी आहे. त्याला काजू आणि बदामाची अॅलर्जी होती, ज्याला अॅनाफिलेक्सिस म्हणून ओळखले जाते. हिगिन्सनने एका रेस्टॉरंटमधून बटर चिकन करी खरेदी केली. पॅकिंगवर बटर चिकन करीत बदाम असल्याचे लेबल लावले असतानाही आणि अॅलर्जीची योग्य माहिती असूनही हिगिन्सन त्याचे सेवन केले.
मिरर'ने शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार, हिगिन्सन यांनी यापूर्वी शेंगदाणे असलेले पदार्थ खाल्ले होते. मात्र, त्यावेळी त्याला कोणताही त्रास जाणवला नव्हता. यामुळे बटर चिकन करी खाल्ल्याने त्याला काही त्रास होणार नाही, असे त्याला वाटले.
अॅलर्जीची प्रतिक्रिया जाणवल्यानंतर त्याच्या मांडीवर एपिपेन देण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. कुटुंबीयांनी त्यांना रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवले आणि तातडीच्या मदतीसाठी तातडीने ९९९ वर फोन केला. रॉयल बोल्टन रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याला अॅड्रेनालाईन देण्यात आले आणि सीपीआर करण्यात आले. मात्र, त्यानंतरही सात दिवसांनी उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले आहे.
हिगिन्सनच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. हिगिन्सन त्याच्या अॅलर्जीबद्दल जागरूक होता आणि संभाव्य एलर्जीनसाठी डिशची कसून तपासणी केली होती, असे त्याच्या कुटुंबियांनी ठामपणे सांगितले.
आपल्या भावाच्या मृत्यूबद्दल बोलताना त्याची बहिण एमिली हिगिन्सन म्हणाली, "अॅलर्जी असलेल्या लोकांनी नेहमीच परिस्थितीला गांभीर्याने घेतले पाहिजे. ही अशी गोष्ट नाही की त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. असे करणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. हिगिन्सनला त्याच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वीच अॅलर्जी झाल्याचे निदान झाले होते आणि त्यांना एपिपेन या अॅलर्जी प्रतिक्रियांचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेले डिव्हाइस देण्यात आले होते.