ब्रिटनमधील लेबर पार्टीने १४ वर्षापासून सत्तेत असलेल्या कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला सार्वत्रिक निवडणुकीत (UK Elections 2024) धूळ चारली आहे. आतापर्यंत कीर स्टारमर (Keir Starmer) यांच्या लेबर पार्टीला (Labour Party ) ३३.९ टक्के मते मिळाली असून त्यांच्या ४१० जागा निवडून आल्या आहेत. दुसरीकडे ऋषि सुनक आणि त्यांच्या पक्षाला केवळ ११९ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी ब्रिटनमध्ये ३२६ जागांची आवश्यकता आहे. आता कीर स्टारमर (Keir Starmer) ब्रिटनचे नवे पंतप्रधान असणार आहेत.
ऋषि सुनक यांच्याबरोबरच या निवडणुकीत अन्य काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी विजय मिळवला आहे. लेबर पार्टीने हाउस ऑफ कॉमन्समध्ये ३२६ जागांचा बहुमताचा आकडा पार केला आहे. कीर स्टारमर नवे पंतप्रधान बनतील. ऋषि सुनक यांच्यासह सध्याच्या संस्देत भारतीय वंशाचे १५ खासदार होते. यामध्ये लेबर पार्टीचे ८ तर कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे ७ खासदार होते. यावेळी भारतीय वंशाच्या खासदारांची संख्या मागच्या संसदेहून अधिक आहे. यावेळी ६८० जागांपैकी १०७ भारतीय उमेदवार रिंगणार होते.
विद्यमान पंतप्रधान आणि कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते ऋषि सुनक यांनी उत्तर इंग्लंड जागेवरून विजय मिळवला आहे. मात्र मागच्या पेक्षा यंदा त्यांचे मताधिक्य घटले आहे.
शिवानी राजा:
कन्झर्व्हेटिव्ह पार्टीची नेत्या शिवानी राजा यांनी लीसेस्टर ईस्ट मधून विजय मिळवला आहे. त्यांच्या सांना माजी खासदार क्लाउड वेब आणि कीथ वाज़ यांच्यासारख्या दिग्गजांशी होते. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शिवानी राजा यांचा जन्म लीसेस्टरमध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण हेरिक प्राइमरी, सोअर व्हॅली कॉलेज येथून झाले.
कनिष्क नारायण:
लेबर पार्टीचे नेते कनिष्क नारायण वेल्शमधून निवडणूक जिंकलेले अल्पसंख्याक वर्गातील पहिले खासदार बनले आहेत. नारायण यांनी पूर्व वेल्श सेक्रेटरी अलुन केर्न्स यांना पराभूत केले. त्यांच्या जन्म भारतात झाला होता मात्र १२ व्या वर्षी ते कार्डिफला गेले होते.
कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या नेत्या सुएला ब्रेवरमॅन यांनी फेयरहॅम आणि वाटरलूविल जागेवरून विजय मिळवला. ते ऋषि सुनक सरकारमध्ये मंत्री होत्या मात्र त्यांना पदावरून हटवले होते.
लेबर पार्टीच्या उमेदवार प्रीत कौर गिल बर्मिंघम एजबेस्टन सीटवरून जिंकल्या आहेत. त्यांचा सामना कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार अश्विर संघा होते. या उमेदवारांसोबत खालील भारतीय वंशाच्या उमेदवारांना विजय मिळाला आहे. प्रीती पटेल (हुजूर पक्ष), नवेंदू मिश्रा (मजूर पक्ष), तनमनजीत सिंग ढेसी (मजूर पक्ष), व्हॅलेरी वाझ (मजूर पक्ष), सोनिया कुमार (मजूर पक्ष), हरप्रित उप्पल (मजूर पक्ष), डॉ. नील शास्त्री-हर्स्ट (हुजूर पक्ष), सीमा मल्होत्रा (मजूर पक्ष), वरिंदर जुस (मजूर पक्ष), गुरिंदर जोसन (मजूर पक्ष), जस अठवाल (मजूर पक्ष), बॅगी शंकर (मजूर पक्ष), सतवीर कौर (मजूर पक्ष)
संबंधित बातम्या