Ujjain Family Rescued By Police: बिहार येथील कुटुंबाला गुगल मॅपवर विश्वास ठेवणे चांगलेच महागात पडले. या कुटुंबाने गोव्याला जाताना कर्नाटकातील बेळगावजवळ गुगल नेव्हिगेशनचा वापर करत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. खानापूर परिसरातील जंगलाजवळ गुगल मॅपने त्यांना शॉर्टकट मार्ग दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर गाडी थेट जंगलाच्या मधोमध अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोबाईलला नेटवर्क नसल्याने या कुटुंबाला जंगलात रात्र घालवावी लागली.
जंगलाच्या मधोमध नेटवर्क नसल्यामुळे गुगल मॅपही चालत नव्हते. हे कुटुंब बराच वेळ जंगलात भटकत राहिले. घनदाट जंगलाच्या मधोमध वन्य प्राण्यांचाही वावर सुरू होता. कसेबसे चार किलोमीटर चालल्यानंतर एका ठिकाणी मोबाइल नेटवर्क काम करू लागले. त्यानंतर त्यांनी आपत्कालीन क्रमांकावर फोन करून स्थानिक पोलिसांकडे मदत मागितली. यानंतर पोलिसांनी या कुटुंबाचे लोकेशन शोधून काढले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुटुंबाला जंगलाबाहेर काढले.
गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यावरून कार चालवणे आयआयटी दिल्लीच्या तीन विद्यार्थ्यांना महागात पडले. गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने कार थेट कालव्यात पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण तिन्ही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी बदाऊन ते फरीदपूर बरेलीला जोडणाऱ्या अपूर्ण पुलावरून पडून कारसह तीन तरुणांचा मृत्यू झाला होता, जे गुगल मॅपवर विश्वास ठेवून कार चालवत होते.
रुहिलखंड विद्यापीठाच्या सीएसआयटी विभागाचे प्रा. एस एस बेदी म्हणतात की, शहराचा विकास झाला की, गूगल मॅप त्याचा मार्ग बदलत नाही. तर, त्याचे स्वरूप बदलते. गुगल मॅपचा बराच काळ वापर केल्याने लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, मुख्य रस्ता, जिल्हा मार्ग याशिवाय इतर मार्गावरून प्रवास करताना गुगल मॅपसह स्थानिक लोकांकडून माहिती घ्या. यामुळे गुगल मॅप नियमित अपडेट करत राहा. स्ट्रीट व्यूचा वापर करा, ज्यामुळे संभाव्य धोका टाळता येतो.
संबंधित बातम्या