'उग्रम' असॉल्ट रायफल ठरणार गेमचेंजर! आत्मनिर्भर भारत अंतर्गत १०० दिवसांत विकसित केलेली पहिलीच रायफल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'उग्रम' असॉल्ट रायफल ठरणार गेमचेंजर! आत्मनिर्भर भारत अंतर्गत १०० दिवसांत विकसित केलेली पहिलीच रायफल

'उग्रम' असॉल्ट रायफल ठरणार गेमचेंजर! आत्मनिर्भर भारत अंतर्गत १०० दिवसांत विकसित केलेली पहिलीच रायफल

Jan 09, 2024 06:15 AM IST

ARDE devloped Ugram assault in record time: भारतीय लष्कर, निमलष्करी दल व पोलिस दलांच्या गरजा पाहता डीआरडीओच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना प्रयोग शाळेने खासगी कंपनीची मदत घेऊन पहिलीच रायफल तयार केली आहे.

ARDE devloped Ugram assault in record time
ARDE devloped Ugram assault in record time

ARDE devloped Ugram assault in record time: भारतीय सशस्त्र दलाची गरज पाहता वेगवान, अचूक आणि कोणत्याही परिस्थितीत सक्षमपणे लक्ष्य वेधणाऱ्या रायफलची मागणी होत होती. ही मागणी पाहता डीआरडीओच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था प्रयोग शाळेने खासगी शस्त्रास्त्र निर्मिती कंपनी द्वीपाच्या साह्याने केवळ १०० दिवसांत आत्मनिर्भर भारत अंतर्गत उग्रम असॉल्ट रायफल तयार केली आहे. या रायफलच्या काही चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तर काही चाचण्या बाकी असून सशस्त्र दलांच्या मागणीनुसार याचा लवकरच पुरवठा केला जाणार आहे.

Bilkis Bano Case : सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालावर बिल्किस बानोची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

भारतीय सशस्त्र दले तसेच निमलष्करी आणि पोलीस दलांसह सुरक्षा दलांमध्ये लहान शस्त्रांची मागणी पाहता, शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था (एआरडीई)ने हैदरबाद येथील द्विपा आर्मर इंडिया या कंपनीच्या मदतीने 'उग्रम' ही स्वदेशी रायफल विकसित केली. एआरडीईत सोमवारी लहान शस्त्रास्त्र बॅरल उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले. या नव्या सुविधेद्वारए भारतीय सशस्त्र दलांना व खाजगी क्षेत्राला लहान शस्त्रास्त्र निर्मितीसाठी बॅरल्स तयार करून दिले जातील अशी माहिती एआरडीईच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. याच कार्यक्रमात ही स्वदेशी रायफल देखील सादर करण्यात आली.

मालदीव वादादरम्यान भारताचा मित्र इस्रायल आला मदतीला, फोटो शेअर करत लक्षद्वीपबाबत केली मोठी घोषणा

ही रायफल वापरण्यास अतिशय सोपी आणि हलकी आहे. या बाबाबत माहिती देतांना एआरडीईचे लहान शस्त्रास्त्र विभागातील शास्त्रज्ञ गौरव वर्मा म्हणाले, "ही रायफल ७.६२x५१ एमएम असॉल्ट रायफल आहे. ही रायफल केवळ १०० दिवसांत विकसित करण्यात आली आहे. भारतीय सैन्य आणि निमलष्करी दलांच्या गरजा ओळखून ही रायफल विकसित करण्यात आली आहे. या रायफलमध्ये २० काडतुसे असलेली मॅगझिन असून ही रायफल आटोमेटिक प्रकारातील आहे. या बंदुकीची प्रभावी मारक क्षमता ही ५०० मीटरपर्यंत आहे. मॅगझिनसह रायफलचे वजन ४ किलो एवढे आहे. ही रायफल पूर्णपणे स्वदेशी आहे, असे देखील वर्मा म्हणाले. ही रायफल द्विपा आणि एआरडीईने एकत्र तयार केली. या रायफलचे प्रात्यक्षिक देखील एआरडीईच्या फायरिंग रेंज वर करण्यात आले. सध्या एआरडीई या रायफलच्या आणखी काही अंतर्गत चाचण्या घेणार आहेत. त्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात भारतीय लष्करातील अधिकारी अनाई एआरडीईच्या तज्ञांचा देखील समावेश आहे.

एआरडीईचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ ए राजू, म्हणाले, या रायफलच्या आणखी काही चाचण्या करण्यासाठी आम्हाला ५ रायफली मिळाल्या आहेत. या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात आम्ही या रायफलच्या आणखी काही चाचण्या घेऊ. या रायफलची गोळीबार करण्याची क्षमता, लक्ष्य वेध घेण्याची क्षमता, तिची कार्यपद्धती, मारक क्षमता आदी बाबी तपासल्या जाणार आहेत. तसेच सर्वाधिक उंचीवर बर्फाळ प्रदेशात, वाळवंटात या रायफलच्या आणखी काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या दरम्यान, काही समस्या आल्यास त्या दुरुस्त करून ही रायफल आणखी अचूक आणि घातक केली जाणार आहे.

नितेश राणेंनी घेतली शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट; नारायण राणे म्हणाले तो काय देशाचा मोठा नेता होता की विद्वान?

एआरडीई येथे विकसित केलेल्या बॅरल उत्पादन सुविधेबद्दल बोलताना संचालक ए राजू म्हणाले, "या प्रकल्पाला तीन वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती आणि प्रकल्पासाठी ६० कोटी खर्चाची आवश्यकता होती. सध्या सात ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये ही सुविधा आहे. छोट्या बंदुका आणि रायफलच्या बॅरल उत्पादनाच्या गरजा या आमच्या नव्या सुविधेतून भागवल्या जाऊ शकतात. केवळ ६ मिनिटांत आम्ही या नव्या सुविधेद्वारे १ बॅरल तयार करू शकतो.

द्विपा आर्मर इंडियाचे संचालक जी राम चैतन्य रेड्डी म्हणाले, "ही रायफल भारतीय सशस्त्र दलांच्या गरजा ओळखून तया रकरण्यात आली आहे. या रायफलचे डिझाइन आणि उत्पादन भारतात करण्यात आले आहे. त्यामुळे ही रायफल संपूर्ण स्वदेशी आहे. सध्या लहान शस्त्रांची, मोठी कमतरता आहे. जगात रशिया युक्रेन आणि इस्रायल हमास संघर्ष सुरू आहे. यामुळे देखील या शास्त्रास्त्रांचा तुटवडा आहे. ही शस्त्रे भारतात आयात केली जातात. यामुळे लहान शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये आम्हाला मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असून भारतीय सुरक्षा दलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही ही रायफल विकसित केली आहे. सुमारे १० ते १२ तज्ञांचा एक गट गेल्या ३ महिन्यांपासून या रायफलच्या निर्मितीसाठी सतत काम करत आहे. १०० दिवसांत तयार करण्यात आलेली ही बहुदा पहिलीच रायफल असावी. आणखी काही चाचण्या करण्यासतही आणखी १५ रायफल्स एआरडीईला पुरविल्या जाणार आहेत.

काय आहे एआरडीई

डीआरडीओच्या काही प्रयोग शाळांपैकी एआरडीई ही एक प्रयोग शाळा आहे. ही पुण्यात पाषाण येथे आहे. स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मिती, त्यांचे संशोधन, डिझाइन आणि विकास प्रामुख्याने या ठिकाणी केला जातो. या प्रयोगशाळेने अनेक लहान शस्त्रे, तोफा, रॉकेट यंत्रणा, हवेतून वितरित युद्धसामग्री आणि शस्त्रास्त्रे विकसित केली आहेत. एआरडीईने पिनाका ही मल्टी बरेल सिस्टिम असलेले रॉकेट यंत्रणा देखील विकसित केली आहे. तसेच INSAS ही असॉल्ट रायफल देखील विकसित केली असून ती भारतीय लष्करामार्फत वापरण्यात येते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर