UGC-NET Exam : १५ जानेवारीला होणारी यूजीसी-नेट परीक्षा पुढं ढकलली, नेमकं कारण काय?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UGC-NET Exam : १५ जानेवारीला होणारी यूजीसी-नेट परीक्षा पुढं ढकलली, नेमकं कारण काय?

UGC-NET Exam : १५ जानेवारीला होणारी यूजीसी-नेट परीक्षा पुढं ढकलली, नेमकं कारण काय?

Jan 13, 2025 11:17 PM IST

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) बुधवारी होणारी विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) पोंगल व मकर संक्रांती सणांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलली आहे.

यूजीसी परीक्षा स्थगित (Representational image)
यूजीसी परीक्षा स्थगित (Representational image) (HT_PRINT)

UGC-NET Exam Postponedनॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी १५ जानेवारी रोजी होणारी यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीएने सांगितले की, १५ जानेवारी होणारी नेट परीक्षा पोंगल आणि मकर संक्रांती सणांमुळे स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे एनटीएने म्हटले आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) बुधवारी होणारी विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) सणांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलली आहे.  लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल, असे एनटीएने म्हटले आहे, गुरुवारी होणारी यूजीसी-नेट परीक्षा नियोजित वेळेत होईल.

१५ जानेवारी २०२५ रोजी होणारी यूजीसी-नेट डिसेंबर २०२४ परीक्षा पोंगल, मकर संक्रांत आणि इतर सणांमुळे रोजी पुढे ढकलण्याचे निवेदन एनटीएने जारी केले आहे. उमेदवारांच्या हितासाठी एनटीएने १५ जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नवी तारीख नंतर जाहीर केली जाईल. १६ जानेवारीची परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच घेण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

'

पोंगलच्या काळात यूजीसी-नेट आयोजित करणे असंवेदनशील: द्रमुक खासदार

कनिमोळी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लिहिलेल्या पत्रात केंद्र सरकार पोंगलला यूजीसी-नेट आयोजित करून तामिळनाडूबाबत संपूर्ण असंवेदनशीलता दाखवत असल्याचा आरोप केला होता.

कनिमोळी यांनी धर्मेंद्र प्रधान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पोंगल तामिळांच्या सांस्कृतिक अस्मितेशी खोलवर जोडलेला आहे आणि त्या दिवशी यूजीसी-नेट परीक्षा घेतल्यास पोंगल उत्सव आणि तामिळनाडूतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीवर परिणाम होईल.

"हा निव्वळ निष्काळजीपणा नाही - हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा जाणीवपूर्वक अपमान आहे. पुन्हा एकदा केंद्र सरकारने आपल्या राज्याकडे आणि तेथील जनतेकडे साफ दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे, असे तामिळनाडूच्या नेत्याने पत्रात म्हटले आहे.

ज्युनिअर रिसर्च फेलोशिप, (जेआरएफ) सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एनटीए यूजीसीच्या वतीने वर्षातून दोनदा यूजीसी-नेट आयोजित करते.

तमिळनाडू सरकारने १४ ते १६ जानेवारी २०२५ पर्यंत ३ दिवस पोंगल निमित्त सुटी जाहीर केली आहे. 

परीक्षेचे प्रवेशपत्रेही उपलब्ध –

NTA ने १५ आणि १६ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षांसाठी प्रवेशपत्र जारी केले होते आणि उमेदवारांना UGC NET ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते. मात्र १५ तारखेची परीक्षा पुढं ढकलल्याने नवी तारीख जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना पुन्हा नव्याने प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर