Rajasthan BJP Leader Nathe Khan Viral Video: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नत्थे खान यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना भाजपच्या ग्रामीण अल्पसंख्याक मोर्चाच्या पदावरून हटवण्यात आले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नत्थे खान हे एका हॉटेलमध्ये महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहेत, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नाथे खान यांनी व्हिडिओतील महिला आपली चौथी पत्नी असल्याचे म्हटले आहे. मात्र, या व्हिडिओमुळे विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुराबाद-बांबोरा परिसरातील एका ग्रुपमध्ये सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास नत्थे खान यांच्या मोबाइलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आणि नंतर ग्रुपमधील काही लोकांनी पठाण यांना याची माहिती दिली. नत्थे खान यांनी एका मिनिटात ते डिलीट केले. पण तोपर्यंत अनेकांनी फोटो आणि व्हिडिओ डाऊनलोड करून सोशल मीडियावर शेअर केले. या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना नत्थे खान म्हणाले की, व्हिडिओमधील महिला माझी पत्नी आहे. माझ्या मोबाईलवरून हा व्हिडिओ कोणी ग्रुपमध्ये टाकला आहे, त्यांच्याविरोधात मी कारवाई करेल, असाही त्यांनी इशारा दिला.
व्हायरल व्हिडिओत नत्थे खान हे एका हॉटेलमध्ये असल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांच्यासोबत एक महिला देखील आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाथे खान यांनी ५७ सेकंदाचा व्हिडिओ टाकून आपल्या वतीने स्पष्टीकरण दिले. ‘हे माझे वैयक्तिक आयुष्य आहे. समाजसेवक असल्याने लोक घरात ये-जा करतात. कोणीतरी मोबाईलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी काही लोकांनी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, भाजपचा तगडा नेता अशी नत्थे खान यांची ओळख आहे. दहा वर्षांत तिसऱ्यांदा नत्थे खान यांच्याकडे मोर्चा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजकारणात त्यांच्या कुटुंबाचा दबदबा राहिला आहे. त्यांची सून आसमा खान २०१५ मध्ये भाजपच्या तिकिटावर कुराबादमधून पंचायत समिती सदस्या झाल्या. यानंतर त्यांनी पक्षातून बंडखोरी केली आणि अपक्ष अध्यक्ष बनल्या. व्हिडिओ समोर आल्यानंतर उदयपूर भाजप देहात जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रगुप्त सिंह चौहान यांनी सांगितले की, व्हिडिओ समोर आल्यानंतर नाथे खान यांना पदावरून हटवण्यात आले आहे. मात्र, भाजप नेत्याचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
संबंधित बातम्या