UCO Bank bharti : युको बँकेत २५० जागांसाठी भरती; अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस, इथं करा अर्ज
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UCO Bank bharti : युको बँकेत २५० जागांसाठी भरती; अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस, इथं करा अर्ज

UCO Bank bharti : युको बँकेत २५० जागांसाठी भरती; अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस, इथं करा अर्ज

Feb 04, 2025 11:08 AM IST

UCO Bank LBO Recruitment 2025 : युको बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदांची भरती सुरू असून त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या आहे.

UCO Bank bharti : युको बँकेत २५० जागांसाठी भरती; अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस, इथं करा अर्ज
UCO Bank bharti : युको बँकेत २५० जागांसाठी भरती; अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस, इथं करा अर्ज

UCO Bank : युको बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांच्या २५० जागांसाठी भरती सुरू असून या नोकरीसाठी अर्ज करण्याची उद्या, बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले, पण अद्याप अर्ज न केलेले उमेदवार युको बँकेच्या ucobank.com या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे

> भारत सरकारकडून मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी किंवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता. 

> उमेदवाराकडे वैध गुणपत्रिका / पदवी प्रमाणपत्र असणं आवश्यक

> पदासाठी नोंदणी करताना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शविणं आवश्यक

> उमेदवाराचं वय २० ते ३० वर्षादरम्यान असावं.

शुल्क किती?

अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क किंवा सूचना शुल्क १७५/- रुपये आणि इतर सर्वांसाठी ८५०/- रुपये आहे. 

अर्ज शुल्क/ सूचना शुल्क ऑनलाइन भरण्याकरिता बँक व्यवहार शुल्क उमेदवाराला द्यावं लागेल. शुल्क / सूचना शुल्क एकदा भरल्यानंतर कोणत्याही खात्यावर परत केलं जाणार नाही किंवा ते इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही.

रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

गुजरात : ५७ पदे

महाराष्ट्र : ७० पदे

आसाम : ३० पदे

कर्नाटक : ३५ पदे

त्रिपुरा: १३ पदे

सिक्कीम: ६ पदे

नागालँड: ५ पदे

मेघालय: ४ पदे

केरळ : १५ पदे

तेलंगणा आणि आंध्र प्रदेश: १० पदे

जम्मू काश्मीर: ५ पदे

अधिक माहितीसाठी, उमेदवार तपशीलवार अधिसूचना पाहू शकतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर