मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: बाप- लेकीमधील संभाषण प्रवाशानं ऐकलं; दिलं असं सरप्राइज की पाहून उबेर चालक झाला भावूक

Viral News: बाप- लेकीमधील संभाषण प्रवाशानं ऐकलं; दिलं असं सरप्राइज की पाहून उबेर चालक झाला भावूक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 06, 2024 03:09 PM IST

Uber driver Viral News: उबेर चालक आणि त्याच्या मुलीसोबत बोलणे ऐकूुन प्रवाशाने ड्रायव्हरला खास गिफ्ट दिले, जे पाहून तो भावूक झाला.

प्रवाशाने उबेर चालकाला दिलेले गिफ्ट पाहून सगळेच भावूक झाला.
प्रवाशाने उबेर चालकाला दिलेले गिफ्ट पाहून सगळेच भावूक झाला. (Facebook/@Kiran Verma)

Uber driver Viral Video: एका व्यक्तीने शेअर केलेली फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली, जी वाचून अनेकजण भावूक झाले. उबेर चालवणाऱ्या एका संघर्षशील वडिलांशी झालेल्या भेटीची आठवण त्यांनी पोस्टमध्ये सांगितली. उबेर चालक आणि त्याच्या पत्नीसोबतचे संभाषण ऐकून त्याने चालकाला कसे सरप्राइज दिले, हे सांगितले. ही फेसबूक पोस्ट अनेकांच्या हृदयाला भिडणारी ठरली.

ट्रेंडिंग न्यूज

प्रवाशाने आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “मी आज उबर कॅब बूक केली. प्रवासादरम्यान चालकाला फोन आले आणि त्यांनी २-३ वेळा डिस्कनेक्ट केले. त्यानंतर मी त्याला फोन उचलण्याचा आग्रह केला. त्यानंतर त्याने फोन उचलला. दुसऱ्या बाजूला चालकाची मुलगी बोलत होती आणि तिने आपल्या वडिलाकडे स्कूल बॅग मागितली.”

Viral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीचालकावर उधळला बैल! ट्रकखाली येऊन थोडक्यात बचवला; व्हिडिओ व्हायरल

पुढे प्रवाशाने सांगितले की,  “मी चालक आणि त्याच्या पत्नीमधील संभाषण ऐकले. पुढील दोन-तीन दिवस बॅग खरेदी करता येणार नसल्याचे चालकाने आपल्या पत्नीला सांगितले. चालक त्याच्या पत्नीसोबत फोनवर बोलत असताना मी ड्रॉप लोकेशन बदलले. त्यानंतर मी चालकाला माझ्यासोबत येण्यास सांगितले. मी खेरदी करणार असलेली वस्तू खूप जड आहे.  यानंतर चालक माझ्यासोबत आला.  मी त्याला बॅगेच्या दुकानात नेले आणि स्कूल बॅग विकत घेतली. माझ्याकडे पैसे नसल्याने मी माझ्यापत्नीकडून ऑनलाईन पैसे मागून घेतले. यानंतर बॅग चालकाच्या हातात दिली. हे पाहून तो शॉक झाला आणि त्याने माझे आभार मानले.  उबेर चालकाने माझा मोबाईल क्रमांक घेऊन आपल्या मुलीला दिलेल्या नव्या गिफ्टसह तिचा फोटो शेअर केला.”

Viral Video: चौकार रोखण्यासाठी चक्क ५ खेळाडू चेंडूमागे धावले; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल!

दोन दिवसांपूर्वी ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या गाण्याला १.७ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या खास प्रतिक्रिया येत आहेत. "ही सुंदर घटना शेअर केल्याबद्दल धन्यवाद. काही दिवसांपूर्वी मी माझ्या सोसायटीतील एका मोलकरणीने माझ्या शेजाऱ्याच्या मावशीशी बोलताना ऐकले होते की, तिच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि ती पिझ्झाची मागणी करत आहे. पण चीज महाग असल्याने तिला सर्व साहित्य खरेदी करता येत नाही. यानंतर मी पिझ्झासाठी लागणारे साहित्य तिला घेऊन दिले, असे एका युजरने म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग