मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : टॅक्सी चालकाला हस्तमैथुन करताना पाहून घाबरली महिला; म्हणाली, 'त्याने माझ्यावर बलात्कार केला असता'

Viral News : टॅक्सी चालकाला हस्तमैथुन करताना पाहून घाबरली महिला; म्हणाली, 'त्याने माझ्यावर बलात्कार केला असता'

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 16, 2024 02:54 PM IST

Viral News : महिला प्रवासी टॅक्सीमध्ये असतानांही चालकाने गाडीतच हस्तमैथुन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने चालकाच्या या कृत्याचे चित्रीकरण करत त्याला पोलिसांच्या हवाली केले आहे.

महिला प्रवासी टॅक्सीमध्ये असतानांही चालकाने गाडीतच हस्तमैथुन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
महिला प्रवासी टॅक्सीमध्ये असतानांही चालकाने गाडीतच हस्तमैथुन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Viral News : महिला प्रवासी असतानाही कॅब चालकाने गाडीत अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ऑस्ट्रेलियाची आहे. एक महिला काम संपवून टॅक्सीतून घरी परतत असताना अचानक ड्रायव्हरने हस्तमैथुन करायला सुरुवात केली. महिलेचे म्हणणे आहे की हे घाणेरडे दृश्य पाहून तिला तिच्यावर 'बलात्कार' किंवा तिचा खून होईल असे विचार आले. मात्र, महिलेले घरच्यांशी संपर्क साधून चालकाचे चित्रीकरण करून त्याला पोलिसांच्या हवाली केले. कॅब कंपनी उबेरलाही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Medicine Price News : मोठी बातमी! डायबेटीस, हृदयविकार, इन्फेक्शनसह विविध आजारांवरील ४१ औषधं स्वस्त होणार

याहू न्यूजनुसार, २६ वर्षीय टायला पिम्लेट ॲडलेडच्या सीबीडी ते कॅम्पबेलटाऊनला टॅक्सीने जात होती. त्यावेळी दुपारचे साडेतीन वाजले होते. महिलेचे म्हणणे आहे की, यादरम्यान टीला ड्रायव्हरच्या हालचाली लक्षात आल्या. चालक गाडीतच हस्तमैथुन करत असल्याचा दावा या महिलेले केला आहे. टायला म्हणाली मी फक्त हात हलताना पाहिला.' ती महिला म्हणाली, 'तो हस्तमैथुन करत असल्याचे मला स्पष्टपणे दिसत होते.'

न्यायालयाने दखल घेताच ईडी पीएमएलए अंतर्गत आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

माझ्यावर बलात्कार झाला असता

रिपोर्टनुसार, यावेळी टायलाने पोलिसांना कळवण्याचा, ड्रायव्हरवर ओरडण्याचा आणि चालत्या वाहनातून बाहेर पडण्याचा विचार केला. मात्र, तिने शांत होत तिच्या आई आणि प्रियकराशी संपर्क साधला आणि ड्रायव्हरचे चित्रीकरण केले. तिने आईला घराबाहेर थांबायला सांगितले. ती महिला म्हणते, 'माझ्या मनात हे चालले होते की माझा जीव देखील जाऊ शकतो. माझ्यावर बलात्कार होऊ शकतो, हा माणूस मला घाण पद्धतीने स्पर्श देखील करू शकतो.' टायलाने ठरवले की तिने काहीही पाहिले नाही असे भासवायचे. किंबहुना, तिला भीती होती की जर ती चालकावर ओरडली असती तर त्याने या घटनेचा बदला घेतला असता. घरी पोहोचल्यावर तिने ड्रायव्हरला दरवाजे उघडण्यास सांगितले. याहू न्यूजशी बोलताना ती महिला म्हणाली, 'तो पूर्णपणे वळला आणि माझ्याकडे पाहिले. हा क्षण खूप भीतीदायक होता.

कंपनीकडे तक्रार

त्या चालकावर कायमची बंदी घालण्याचे आवाहन टायला यांनी कंपनीला केले आहे. तिने पोलिसात तक्रारही दाखल केली असून त्याच रात्री ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याहू न्यूजनुसार, उबरच्या प्रवक्त्याने ड्रायव्हरचा निषेध केला असून त्याला ॲपमधून काढून टाकण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

IPL_Entry_Point

विभाग