बिहार राज्यातील गोपालगंज येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामीने आपल्या भाचीवरच्या प्रेमापोटी पतीला सोडून तिच्यासोबत लग्न केलं आहे. कुचायकोट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ही घटना घडली. यामुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
गोपालगंजमध्ये आपल्या भाचीच्या प्रेमात वेडी झालेल्या मामीने आपल्या पतीला सोडले आहे. त्यानंतर महिलेने आपल्या भाचीसोबत पळून जाऊन लग्न केले. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या विवाहाची माहिती कुटूंबीयांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार दोघींमध्ये गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. हा प्रकार कुचायकोट पोलीस ठाणे क्षेत्रातील बेलवा गावात घडला आहे.
बेलवा गावात राहणाऱ्या मामी-भाचीने नात्याच्या मर्यादा ओलांडून सासामुसा येथील दुर्गा भवानी मंदिरात विवाह केला. मंदिरात विवाहावेळी सर्व विधी पार पाडले गेले. यावेळी दोघींनी एकमेकींच्या गळ्यात वरमाला घातल्या. गळ्यात मंगलसूत्र घालून कपाळाला कुंकू लावले. त्यानंतर सात फेरे घेत सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. विवाहानंतर दोघींनी सोबत जगण्या मरण्याच्या शपथा घेतल्या.
आपली भाची शोभा हिच्या प्रेमात वेडी झालेल्या मामी सुमनने म्हटले की, शोभा खूपच सुंदर आहे. मला भीती वाटत होती की, जर तिचे दुसरीकडे लग्न झाले असते तर ती मला सोडून गेली असती. यामुळे आम्ही दोघांनी सर्व नाती सोडून मंदिरात विवाह केला. शोभा हिने सांगितले की, आम्ही सासामुसा मंदिरात विवाह केला. लग्नानंतर आम्ही सोबत जगण्या मरण्याच्या शपथा घेतल्या.
गोपालगंजमध्ये मामी-भाचीचा झालेला विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या अनोख्या विवाहाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या विवाहाची माहिती दिली. व्हिडिओमध्ये दोघींनी म्हटले की, दोघींनी आपल्या मर्जीने विवाह केला असून जन्मोजन्मी सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत.