मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू

दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू

Jan 15, 2024 12:20 PM IST

two indian student died in America : दोन आठवड्यापूर्वी अमेरिकेत शिकण्यासाठी आलेल्या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. दोघेही रूममेट असून झोपेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

two indian student died in America
two indian student died in America

two indian student died in America : उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची मोठी संख्या आहे. असेच दोन विद्यार्थी हे दोन आठवड्यापूर्वी अमेरिकेत शिक्षणासाठी गेले होते. मात्र, अमेरिकेतील कनेक्टिकटमध्ये त्यांच्या संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे. हे विद्यार्थी अभ्यासासाठी १६ दिवसांपूर्वीच अमेरिकेत पोहोचले होते. दोन्ही विद्यार्थी एकाच खोलीत राहत होते. दरम्यान, झोपेत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

sharad mohol case : शरद मोहोळ हत्या प्रकरणी पनवेलमध्ये कारवाई! गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणेला अटक; ११ जण ताब्यात

एका विद्यार्थ्याचे नाव गट्टू निदेश असून तो तेलंगणातील वानापर्थी येथील मुळ राहणारा आहे. तर दुसऱ्या विद्यार्थ्याचे नाव श्रीकाकुलम असे आहे. तो आंध्र प्रदेशचा येथील रहिवासी होता. दिनेशचे वडील गहू व्यंकटण्णा यांनी दोघांचाही मृत्यू कार्बन मोनोऑक्साइडच्या विषबाधेमुळे झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, दोघांच्या मृत्यू बाबत अमेरिकन प्रशासनाकडून कोणतेही माहिती अथवा विधान करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दिनेशच्या काकांनी सांगितले की, शेजारी राहणारे त्याचे मित्र जेव्हा त्याच्या खोलीत पोहोचले आणि त्यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते दोघांनीही प्रतिसाद दिला नाही. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत रुग्णवाहिका देखील मागवली. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

ट्रेंडिंग न्यूज

HIngoli Murder : हिंगोली हादरले! पैसे देत नसल्याच्या रागातून सख्ख्या भावासह आई- वडिलांची हत्या; अपघाताचा रचला बनाव

दिनेशने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केले आहे. यानंटर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कनेक्टिकटच्या सेक्रेड हार्ट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता. त्याचे शालेय शिक्षण महबूबनगर येथून झाले आणि नंतर हैदराबादला जाऊन इंटरमिजिएट पूर्ण केले. साईनाथच्या म्हणण्यानुसार, त्याचे कुटुंबीय दिनेशला हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावर सोडण्यासाठी आले होते. मात्र, दोन आठवड्यात त्यांच्या मृत्यूची बातमी आल्याने दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय मुले ही शिक्षण घेण्यासाठी जात असतात. येथील मोठ्या विद्यापीठात प्रवेश घेऊन चांगल्या नोकरीच्या संधि देखील ही मुले शोधत असतात. मात्र, या प्रकारच्या घटनेमुळे अमेरिकेत गेलेल्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर