Viral Video: आधी केस पकडले, नंतर जमीनीवर आपटलं; गांजा ओढण्यावरून दोन साधू आपआपसात भिडले?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: आधी केस पकडले, नंतर जमीनीवर आपटलं; गांजा ओढण्यावरून दोन साधू आपआपसात भिडले?

Viral Video: आधी केस पकडले, नंतर जमीनीवर आपटलं; गांजा ओढण्यावरून दोन साधू आपआपसात भिडले?

Jan 08, 2025 07:49 PM IST

Sadhus Fighting Video: दोन साधूंच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, हा व्हिडिओ कुंभमेळ्यातील असल्याचे बोलले जात आहे.

आधी केस पकडले, नंतर जमीनीवर आपटलं; गांजा ओढण्यावरून दोन साधू आपआपसात भिडले?
आधी केस पकडले, नंतर जमीनीवर आपटलं; गांजा ओढण्यावरून दोन साधू आपआपसात भिडले?

Viral News: हिंदू धर्मीयांसाठी महाकुंभमेळा हा अतिशय श्रद्धेचा विषय आहे. दर १२ वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. या कुंभमेळ्याला आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना दोन सांधूंमधील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गांजा ओढण्यावरुन हे दोन्ही साधू आपआपसात भिडले, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. @B_L__VERMA नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कुंभमेळ्यात दोन साधू गांजा ओढण्यावरून आपआपसात भिडले आहेत, असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

हा व्हिडिओ यावर्षी प्रयागराज येथे होणाऱ्या कुभमेळ्यातील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या व्हिडिओबाबत अधिक तपासणी केली असता हा व्हिडिओ दिशाभूल करणारा ठरला. कारण हा व्हिडिओ कुंभमेळ्यातील नसून केदारनाथ येथील असेल. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकदा दिशाभूल करणारे व्हिडिओ पसरवले जातात. त्यामुळे कोणत्याही व्हिडिओ, फोटो किंवा बातमीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. एखाद्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य समोर येत नाही, तोपर्यंत तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर