नोएडा सेक्टर २७ मधील एका नामांकित शाळेच्या ज्युनिअर विंगमध्ये शिकणाऱ्या साडे तीन वर्षांच्या मुलीवर डिजीटल बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सेक्टर-२० पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी मुलीचा वर्ग शिक्षक असून दुसरा सुरक्षा पर्यवेक्षक आहे. तपासा दरम्यान या दोघांनी ही घटना लपवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सेक्टर २७ मधील एका खासगी शाळेच्या कनिष्ठ शाखेत शिकते. १० दिवसांपासून मुलगी शांत बसत होती, कोणाशीही बोलत नव्हती, ती शाळेतही जात नव्हती. त्यानंतर आई-वडील मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये छेडछाड करण्यात आली आहे.
घरच्यांनी प्रेमाने मुलीला या घटनेबद्दल विचारले असता मुलीने सांगितले की, शाळेत थाळी देणाऱ्या मुलाने दोन दिवसांपूर्वी काहीतरी टोचले आहे. तेव्हापासून मला त्रास होत आहे. मुलीच्या म्हणण्यानुसार, कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी घडली असून कुटुंबीयांनी १० ऑक्टोबर रोजी सेक्टर २० पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्याच दिवशी पोलिसांनी आरोपी कर्मचारी नित्यानंद (रा. निठारी) याला अटक करून तुरुंगात पाठवले. मुलीच्या वडिलांनी शाळा व्यवस्थापनावर ही घटना लपवून ठेवल्याचा आणि तक्रार केल्यास मुलीला धमकावल्याचा आरोप केला होता. एडीसीपी मनीष कुमार मिश्रा यांनी सांगितले की, तपासादरम्यान असे आढळले की शाळेचे कार्यालय प्रशासक/ सुरक्षा पर्यवेक्षक दयामय महतो आणि पीडितेचे वर्ग शिक्षक मधु मेंघानी यांनी घटना लपवण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान यासंदर्भातील पुरावे मिळाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई केली जात आहे.
‘डिजिटल रेप’ हा डिजिटल पद्धतीने केलेल्या कोणत्याही लैंगिक गुन्ह्याशी संबंधित नाही, जसे की इंटरनेटवर किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून एखाद्याची प्रतिमा खराब करणे. तथापि, संमतीशिवाय दुसर्या व्यक्तीच्या खाजगी भागामध्ये बळजबरीने हाताची वा पायाची बोटे घालण्याच्या म्हणजे डिजिटल रेप. डिजिटल रेप प्रकरणात काय शिक्षा होऊ शकते याविषयी आता जाणूया. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ नुसार, डिजिटल रेप प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, शिक्षा १० वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते.
संबंधित बातम्या