Gwalior Crime News : मध्य प्रदेश दिवसाढवळ्या एका तरुणीचे अपहरण झाल्याने खळबळ माजली आहे. घटना ग्लाल्हेरमधील असल्याचे सांगितले जात आहे. दोन तरुणांनी मोटारसायकल वरून महिलेचे अपहरण केले. ही संपूर्ण घटना तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी घडली. तरुणी आपल्या कुटूंबासोबत बस स्टँडवर उतरल्यानंतर ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, तरुणी भिंड येथील रहिवासी आहे आणि ग्वाल्हेरमध्ये आपल्या भावाच्या घरी राहून बीएचा अभ्यास करत आहेत. दिवाळीनिमित्त ती आपल्या गावी भिंड येथे गेली होती. सोमवारी ती ग्वाल्हेरला परत आली व बस स्डँडवरून रिक्षाने झांसी रोड पोहोचली होती.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, एक व्यक्ती पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकलवर बसून वाट बघत आहे. इतक्यात दुसरा व्यक्ती तरुणीला जबरदस्तीने ओढत आणून बाईकवर बसवतो. त्यानंतर स्वत:ही बसण्याचा प्रयत्न करतो मात्र तोपर्यंत बाईक पुढे जाते. त्यानंतर काही अंतरापर्यंत तो बाईकला पकडण्याचा प्रयत्न करतो व त्यानंतर बसून निघून जातो. यावेळी पेट्रोल पंपावर बरेच लोक असतात मात्र कोणही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार महिलेच्या कुटूबीयांनी सांगितले की, आजच ते ग्वाल्हेरला पोहोचले होते. बस स्टॉपवर उतरताच तरुणी आपल्या भावाला घेऊन पेट्रोल पंपाजवळील स्वच्छतागृहात घेऊन गेली. काही वेळाने मुलगा पळत आला व म्हणाला की, कोणीतरी त्याच्या बहिणीला पळवून नेले आहे. तरुण रडत होती. पेट्रोल पंपाजवळ उभे असलेल्या लोकांनीही तिच्या रडण्याचा आवाज ऐकला होता. कुटूंबाने तत्काळ पोलीस ठाणे गाठून मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी सांगितले की, हे कुटूंब बसमधून उतरून एका पेट्रोल पंपाजवळ थांबले होते. ते गाडीतून आपले सामान खाली उतरत असताना आरोपींनी मुलीला पकडून मोटार सायकलवर बसवले व फरार झाले. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून समजते की, मुलीचे अपहरण झाले आहे. आरोपींचा शोध शुरू आहे.
संबंधित बातम्या