Viral Video: तो माझा बॉयफ्रेन्ड आहे, नाही माझा आहे; एका तरुणासाठी दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: तो माझा बॉयफ्रेन्ड आहे, नाही माझा आहे; एका तरुणासाठी दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी!

Viral Video: तो माझा बॉयफ्रेन्ड आहे, नाही माझा आहे; एका तरुणासाठी दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी!

Dec 19, 2024 04:55 PM IST

Girls Fighting Over Boyfriend: एका तरुणासाठी दोन मुलींनी भरस्त्यात एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी आणि चप्पलने मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ: एका तरुणासाठी दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी!
व्हायरल व्हिडिओ: एका तरुणासाठी दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी!

Viral News: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये रस्त्यावर दोन मुलींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना काझी मोहम्मदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रेस्टॉरंटजवळ घडली. असे सांगितले जात आहे की, दोघांमध्ये त्यांच्या एका तरुणावरून वाद झाला, त्यानंतर हाणामारी झाली. व्हिडिओमध्ये दोन्ही मुली एकमेकांवर चप्पलचा वर्षाव करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली कॉलेजमध्ये शिकतात. त्यांच्यासोबत आणखी दोन मुली देखील होत्या. चौघे रस्त्याने चालत असताना दोन मुलींमध्ये वाद झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही मुलींमध्ये एका तरुणावरून वाद सुरू झाला. त्यावेळी राग अनावर झाल्याने एका मुलीने दुसऱ्याच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर भांडणाला सुरुवात झाली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही मुली एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी आणि चप्पलने मारहाण करताना दिसत आहेत. त्यांच्या सोबत असलेल्या दोन मुली भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अनेकदा रस्त्यावरून जात असलेल्या लोकांनी या मुलींमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या दोघेही ऐकायला तयार नव्हत्या. वारंवार त्या एकमेकींच्या अंगावर धावून जात होत्या. या भांडणामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी जमा झाली होती. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका दुकानदाराने सांगितले की, जेव्हा दोन मुलींमध्ये भांडण सुरू झाले, तेव्हा तिथे लोकांनी प्रचंड गर्दी केली. एका व्यक्तीने त्यांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. पंरतु, तोही अपयशी ठरला. दोन्ही मुली जणू जीवघेण्या शत्रू असल्याप्रमाणे एकमेकांशी भांडत होत्या. या संपूर्ण घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

दोन दिवसांपूर्वीच उत्तराखंड डेहरादूनच्या रायपूर भागात दोन मुलींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत दोन्ही मुली एकमेकींना मारहाण करताना दिसत आहे. आजूबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसले. मात्र, दोघींनीही कोणाचेच ऐकले नाही. भांडणाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, एका तरुणावरून त्यांच्यात वाद सुरू झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या व्हिडिओत दोन्ही मुली एकमेकींना शिवीगाळ करत असल्याचेही ऐकू येत आहे. या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या शेजारी उभा असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला, जो आता सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर