भन्नाट शक्कल! दोन भावांनी कारला बनवले 'हेलिकॉप्टर', मात्र बाहेर काढताच पोलिसांची पडली नजर, अन् ..
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भन्नाट शक्कल! दोन भावांनी कारला बनवले 'हेलिकॉप्टर', मात्र बाहेर काढताच पोलिसांची पडली नजर, अन् ..

भन्नाट शक्कल! दोन भावांनी कारला बनवले 'हेलिकॉप्टर', मात्र बाहेर काढताच पोलिसांची पडली नजर, अन् ..

Published Mar 19, 2024 11:40 PM IST

Car Converted Into Helicopter : उत्तरप्रदेश राज्यातील आंबेडकर नगरमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे दोन भावांनी कारला मॉडिफाय करून त्याचे रुपांतर चक्क हेलिकॉप्टरमध्ये केले.

कारचे बनवले हेलिकॉप्टर
कारचे बनवले हेलिकॉप्टर

हेलीकॉप्टरमधून नववधूला घरी आणण्याची प्रत्येकाची इच्छी असते, मात्र कमी बजेटमुळे प्रत्येकाची इच्छा सफल होतेच असे नाही. यामुळे कमी बजेट असताना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्याने दुसरी पद्धत अवलंबली तर किती महागात पडू शकते, हे उत्तरप्रदेशमध्ये समोर आले आहे. उत्तरप्रदेश राज्यातील आंबेडकर नगरमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे दोन भावांनी कारला मॉडिफाय करून त्याचे रुपांतर चक्क हेलिकॉप्टरमध्ये केले. या दोन भावांचे स्वप्न होते की, कारला मॉडिफाय करून हेलिकॉप्टर बनवल्याने तो लग्न समारंभात नववधू-वरांना आणण्यासाठी याचा वापर करू शकतील तसेच या माध्यमातून पैसेही येतील. मात्र या भावांची इच्छा पूर्ण होण्याआधीच पोलिसांनी त्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले. 

अंबेडकरनगरमधील अकबरपूर कोतवाली पोलिसांनी बस स्थानकाजवळून दोन भावांना कारसह अटक केली आहे. दोन भावांनी कारचे रुपांतर हेलीकॉप्टरमध्ये केले होते. मात्र पेटिंगसाठी वाहन नेले जात असताना पोलिसांनी पकडले व वाहन जप्त केले.

दोन भावांनी आपली आर्थिक तंगी दूर करण्यासाठी व पैसे कमावण्यासाठी एका व्हॅगनआर कारला मॉडिफाय करत त्याचे रुपांतर हेलिकॉप्टरमध्ये केले होते. यामध्ये त्यांचे उद्देश्य होता की, लग्न कार्यात वधू-वरांना आणण्यासाठी याचा उपयोग केला जाईल. त्यांनी कारच्या वरती पंखे लावले. पाठीमागे वेल्डींग काम करून हेलिकाप्टरचे रुप देण्यात आले. त्यानंतर या रंग देण्यासाठी भीटीहून अकबरपूर जिल्हा मुख्यालयाकडे रवाना झाले.

दोघे भाऊ आपले वाहन घेऊन जाताना रस्त्यावर हे वाहन पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. हेलिकॉप्‍टर हवेत न उडता रस्त्याने जात होते. सर्व लोक दोन भावांचा कारनामा पाहून तोंडात बोटे घालत होते. तेव्हा बस स्थानकाजवळ पोलिसांनी दोघा भावांना रोखले. एमव्ही एक्टनुसार त्यांनी मॉडिफाय केलेले वाहन जप्त करण्यात आले. काही वेळाने पोलिसांनी दंड आकारून वाहन सोडून दिले मात्र त्यांनी सक्त ताकीद दिली की, याचा वापर करायचा नाही. 

याप्रकरणी एएसपी विशाल पांडे यांनी सांगितले की, परिवहन विभागाच्या नियमानुसार कोणत्याही वाहनाला परवानगीशिवाय मॉडिफाय केले जाऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की, अकबरपूर कोतवाली क्षेत्रात चेकिंग अभियान राबवले जात आहे. त्यावेळी दोन भावांना हे वाहन घेऊन जाताना पकडले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर