मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Twitter Edit : ट्विटर युजर्ससाठी आनंदाची बातमी, ट्विटरचं 'एडिट' बटण झालं ॲक्टिव्ह

Twitter Edit : ट्विटर युजर्ससाठी आनंदाची बातमी, ट्विटरचं 'एडिट' बटण झालं ॲक्टिव्ह

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Sep 21, 2022 12:44 PM IST

Twitter Launches Edit Facility : तुम्हीही ट्विटरवर सक्रिय असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्विटर एडिट बटण आजपासून सुरू करण्यात आले आहे. ट्विटर इंडिया येत्या आठवड्यात त्याच्या पेड सबस्क्रायबर्ससाठी "एडिट" बटणची सुविधा देत आहे.

ट्विटरचं एडिट बटण
ट्विटरचं एडिट बटण (हिंदुस्तान टाइम्स)

तुम्हीही ट्विटरवर सक्रिय असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्विटर एडिट बटण आजपासून सुरू करण्यात आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सप्टेंबरच्या सुरुवातीला घोषणा केली होती की त्यांनी नवीन वैशिष्ट्याची अंतर्गत चाचणी सुरू केली आहे. ट्विटर इंडिया येत्या आठवड्यात आपल्या सशुल्क सदस्यांसाठी "एडिट" बटण लॉन्च करेल.

ट्विटर ब्लॉग पोस्टनुसार, ट्विटर ब्लूसाठी दरमहा $४.९९ भरणारे ग्राहक लवकरच ३० मिनिटांत त्यांचे ट्विट "अनेकदा" एडिट करू शकतील. टायपोसारख्या चुका दुरुस्त करण्यासाठी ट्विटर वापरकर्त्यांनी त्यांचे ट्विट पब्लीश झाल्यानंतर एडिट करण्याची मागणी केली आहे.

Facebook, Reddit आणि Pinterest सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने वर्षानुवर्षे वापरकर्त्यांना पोस्ट एडिट करण्याची ऑफर दिली आहे. अहवालानुसार, संपादित केलेल्या ट्विटमध्ये एक आयकॉन आणि टाइमस्टॅम्प असेल, पोस्ट शेवटचं एडिट केल्यानंतर पब्लीश केले जाईल. युजर्सना एडिट हिस्ट्री आणि पोस्टच्या मागील व्हर्जन पाहण्यासाठी एडिट बटणावर क्लिक करावे लागेल.

टेकक्रंचच्या अहवालानुसार, एडिट बटण वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे ट्वीट दुरुस्त करण्यासाठी ३० मिनिटे मिळतील. एडिट ट्विट फेरबदलाचा टाइमस्टॅम्प दर्शविणार्‍या लेबलसह दिसेल. एडिटेड ट्विटची हिस्ट्री पाहण्यासाठी, तुम्हाला ट्विट एडिट करा या बटणावर टॅप करावे लागेल.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या