Twitter Down: ट्विटर पुन्हा डाऊन, यूजर्संना Tweet करण्यात अडचणी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Twitter Down: ट्विटर पुन्हा डाऊन, यूजर्संना Tweet करण्यात अडचणी

Twitter Down: ट्विटर पुन्हा डाऊन, यूजर्संना Tweet करण्यात अडचणी

Updated Jul 01, 2023 10:20 PM IST

Twitter down : मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म ट्विटरची सेवा डाऊन झाली आहे. यामुळे देश-विदेशातील लाखों यूजर्संना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Twitter
Twitter

मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म ट्विटरची सेवा डाऊन झाली आहे. यामुळे देश-विदेशातील लाखों यूजर्संना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यूजर्स एक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ट्विट करण्यात अनेक अडचणी येत आहेत. होमपेजवर Something went wrong असा मेसेज येत आहे. रात्री उशिरापर्यंत ट्विटर सेवा ठप्प होती. 

यूजर्संकडून मीम्सचा पाऊस -

ट्विटर डाऊन झाल्यानंतर यूजर्स त्रस्त झाले. मेसेजिंगसाठी दुसऱ्या प्लेटफॉर्मची मदत घेत आहेत. काही यूजर्स ट्विटर डाउन होण्यावर मीम्स बनवून एलन मस्क यांना ट्रोल करत आहेत. काही यूजर्संनी लिहिले आहे की, एलन मस्क ट्विटर पूर्ववत करण्यात व्यस्त आहेत. 

डाउनडिटेक्टरच्या रिपोर्टनुसार, सोशल मीडिया प्लेटफॉर्म ट्विटर भारत आणि अनेक देशातील वापरकर्त्यांसाठी डाउन झाले आहे. डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार  ७,००० हून अधिक वापरकर्त्यांनी आउटेज ट्रॅकर वेबसाइटला ट्विटर डाउन झाल्याची माहिती दिली.

तिसर्‍यांदा ट्विटर डाऊन झाले आहे. ६ मार्च रोजी ट्विटरला अनेक अडचणी आल्या, कारण लिंक्सने काम करणे थांबवले, काही वापरकर्ते लॉग इन करू शकले नाहीत आणि काहींसाठी फोटो लोड होत नाहीत.

८ फेब्रुवारी रोजी, अनेक Twitter वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर अनेक तांत्रिक समस्या आल्याने त्यांना ट्विट करणे, खाते फॉलो करणे किंवा त्यांच्या थेट संदेशांमध्ये प्रवेश करण्यास समस्या आल्याचे सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर