Twitter Blue Tick news : ट्विटरने व्हेरिफाईड अकाऊंट म्हणून सुरू केलेली ब्ल्युटीक सेवा मध्यरात्रीपासून बंद केली आहे. आता या सेवेसाठी वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहे. वैयक्तिक खात्यावर ब्लू टिकचा कालावधी हा २० एप्रिलपर्यंत होता. आज मध्यरात्री पासून अनेक व्हेरिफाईड यूझरच्या ब्ल्यु टीक या आता बंद झाल्या आहेत.
भारतीय क्रिकेटर विराट कोहली ते बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानसह अनेक बड्या व्यक्तींच्या व्हेरीफाईड ट्विटर अकाऊंटच्या ब्लू टिक्स या काढून टाकण्यात आल्या आहेत. यापुढे जर एखाद्याला ब्लू टिक व्हेरिफिकेशन हवे असेल तर त्याला ट्विटरसाठी पैसे द्यावे लागतील. आता ब्लू टिक्स फक्त त्या ट्विटर अकाऊंटवर दिसतील. ज्यांनी ट्विटरवरून हे बटन सबस्क्राइब केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक प्रमुख नागरिकांच्या आणि सेलीब्रेटिंच्या ट्विटर हँडलवरून ब्लू टिक्स काढून टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये क्रिकेटर्सपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे. इलॉन मस्कच्या ट्विटरने ब्लुटीक बाबत धोरण या पूर्वीच जाहीर केले होते. ज्यांचे खाते व्हेरिफाईड आहेत आता त्यांना या पुढे ब्ल्यु टीक साठी पैसे मोजावे लागणार आहे. ज्यांनी २० एप्रिल आधी या सेवेसाठी पैसे मोजले आहेत, त्यांनाच हे ब्ल्यु टीक देण्यात आले आहेत.
टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेतल्यानंतर ट्विटरच्या अकाऊंट व्हेरीफिकेशन धोरणात अनेक बदल केले आहेत. Twitter ब्लू ची किंमत प्रत्येक देशानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. वापरकरता ज्या देशात लॉगईंन करणार त्या देशाचे धोरणे त्या अकाऊंटला लागू होणार आहे.
अमेरिकेत iOS किंवा Android वापरकर्त्यांना दरमहा ११ डॉलर किंवा दरवर्षी तब्बल ११४.९९ डॉलर ब्लु टीकसाठी मोजावे लागणार आहे. तर वेब वापरकर्त्यांना दरमहा ८ डॉलर किंवा पूर्ण वर्षासाठी ८४ डॉलर भरावे लागतील.