Turkey-Syria Earthquakes' Updates: तुर्की आणि सीरिया एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. या घटनेत आत्तापर्यंत २४ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल १० लाख नागरिकांना खाण्यासाठी अन्न नाही. सध्या सुरू असलेल्या बचाव कार्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळत आहेत. तर मोठ्या संख्येत लोक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अकडल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तुर्कस्तान व सीरियातील भूकंपबळींची संख्या २४ हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा विनाशकारी भूकंप ठरला आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान या भूकंपग्रस्त क्षेत्रास सध्या भेट देत आहेत. एकट्या तुर्कस्तानमधील मृतांची संख्या साडे आठ हजारांच्या पुढे गेली आहे.
पहिल्या दिवशी बचावकार्य तोकडे पडल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु, त्यानंतर आता मदत का सिरियासारख्या भागात अनेक संकटांवरचे हे विनाशकारी संकट असल्याचे सांगून जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी अॅडेलहेड मरशग यांनी या भूकंपग्रस्त प्रदेशात तब्बल दोन कोटी ३० लाख नागरिकांना झळ पोहचल्याची शक्यता व्यक्त केली.
दरम्यान, भूकंपामुळे अचडणीत सापडलेल्या तुर्की आणि सीरियाच्या मदतीसाठी भारत धावून गेला. भारतीय हवाई दलाचे ‘एसी-१७’ विशेष विमान राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकासह भूकंपग्रस्त तुर्की, सीरियाच्या मदतीसाठी मंगळवारी रवाना झाले. सध्या भारताचे वैद्यकीय पथक ठिकठिकाणी काम करत आहेत.
संबंधित बातम्या