कानपूर सेंट्रल स्टेशनच्या रेस्ट रूममधील टॉयलेटमध्ये एका टीटीईचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सीपी सिंह (५५, टूंडला) असे मृत्यू झालेल्या टीटीईचे नाव आहे. खूप वेळ झाला तरी टीटीई बाहेर न आल्याने सहकर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला असता आतमध्ये ते निपचिप पडल्याचे दिसले. तत्काळ डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
माहिती मिळताच त्यांची पत्नी ब्रजलता व छोटी मुलगी यंशिका कानपूरमध्ये दाखल झाले. दुर्गा कालोनी, नगर पालिका रोड टूंडला येथील रहिवासी सीपी सिंह यांची काही दिवसांपूर्वीच कानपूरला बदली झाली होती. ते ट्रेन चेकिंग स्क्वॉडमध्ये आपली सेवा देत होते. सीपी सिंह प्रयागराजहून ट्रेन चेकिंग करत सोमवारी रात्री कानपूरला आले होते. ते प्लेटफार्म नंबर सहाच्या वरती बनवण्यात आलेल्या स्टाफ रेस्ट रूममध्ये थांबले होते. सह कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते टॉयलेटमध्ये गेले होते.
खूप वेळ बाहेर न आल्याने बाहेरून त्यांना आवाज देण्यात आला. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये सीपी सिंह बेशुद्ध होऊन पडले होते. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. हार्ट अटॅकच्या वाढत्या घटनांमुळे दहशतीची वातावरण आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात हार्ट अटॅकचा शिकार होत आहे.
एसीएम संतोष त्रिपाठी यांनी सांगितले की, कानपूरमध्ये सेवा देताना त्यांनी प्रत्येक महिन्याचे टार्गेट पूर्ण केले आहे. याबाबत त्यांची एकही तक्रार आलेली नाही.
संबंधित बातम्या