TTE Video: रेल्वेत टीटीईची गुंडगिरी.. विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, प्रवाशाचा मोबाईलही हिसकावला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  TTE Video: रेल्वेत टीटीईची गुंडगिरी.. विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, प्रवाशाचा मोबाईलही हिसकावला

TTE Video: रेल्वेत टीटीईची गुंडगिरी.. विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, प्रवाशाचा मोबाईलही हिसकावला

Jan 18, 2024 06:27 PM IST

TTE Viral Video : एका ट्रेनमध्येटीटीई (TTE)विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

TTE Viral Video
TTE Viral Video

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ट्रेनमध्ये टीटीई (TTE) विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. एका तरुणाच्या गालावर अनेक थप्पड मारत आहे. तर प्रवाशी इतकेच विचारत आहे की, सर मला का मारत आहात, चूक झाली, मला साडून द्या. अन्य प्रवाशीही हेच सांगताना दिसत आहेत. दरम्यान वरच्या बर्थवर बसलेला एक अन्य प्रवाशाने याघटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सकडून टीटीईवर जोरदार टीका होत आहे. त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. त्यानंतर आता रेल्वेने त्याला सस्पेंड केले आहे. त्याचबरोबर चौकशीचे आदेशही दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बरौनी-लखनऊ एक्सप्रेस (ट्रेन नंबर १५२०३) मधील आहे. यामध्ये प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर टीटीईवर कारवाई करण्यात आली. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही घटना गोरखपूर-लखनऊ दरम्यान झाली आहे.

आरोपी टीटीईचे नाव प्रकाश असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक दृष्टया दोषी आढळल्याने त्याला सस्पेंड करत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहे. व्हिडिओची चौकशी केली जात आहे. व्हिडिओमध्ये TTE एका तरुणाला थप्पडांवर थप्पड मारताना दिसत आहे. ट्रेनमधील अन्य प्रवाशांनी TTE कडे त्या तरुणाला सोडण्याचे आवाहन केले. मात्र टीटीईने कुणाचेही ऐकले नाही, रागात त्याने व्हिडिओ बनवणाऱ्या प्रवाशाचा मोबाईलही हिसकावून घेतला.
 

सोशल मीडियावर यूजर्सकडून संतप्त प्रतिक्रिया -

या घटनेवर एका यूझरने म्हटले की, जरी तिकीट नसले तरी मारहाण करण्याचा अधिकार याला कोणी दिला. दूसऱ्या यूजरने म्हटले की, याच्यावर तत्काळ कारवाई करावी. अन्य एकाने लिहिले की, रेल्वेने TTE ला आधी ट्रेनिंग द्यावी. अन्य एकाने म्हटले की, जर प्रवाशांनी मिळून TTE ची धुलाई केली असती तर हा कायदा शिकवत बसला असता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर