Capsicum Viral Video: शिमला मिरचीत आढळतेय प्राणघातक अळी; पोटात गेल्यास मृत्यू होणार? व्हिडिओ व्हायरल!-truth behind viral video that claims to show deadly worm inside a capsicum ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Capsicum Viral Video: शिमला मिरचीत आढळतेय प्राणघातक अळी; पोटात गेल्यास मृत्यू होणार? व्हिडिओ व्हायरल!

Capsicum Viral Video: शिमला मिरचीत आढळतेय प्राणघातक अळी; पोटात गेल्यास मृत्यू होणार? व्हिडिओ व्हायरल!

Jun 08, 2024 01:09 PM IST

Capsicum Video Fact Check: व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शिमला मिरचीच्या आतून पातळ, धाग्यासारखी अळी बाहेर निघताना दिसत आहे, या व्हिडिओमागील सत्य जाणून घेऊयात.

शिमला मिरचीत प्राणघातक अळी आढळल्याचा दावा करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिमला मिरचीत प्राणघातक अळी आढळल्याचा दावा करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Screengrab)

Viral News: तुम्ही सोशल मीडिया युजर आहात का? मग, शिमला मिरचीच्या आत एक "प्राणघातक अळी" दर्शविणारा व्हिडिओ आपल्या समोर येण्याची दाट शक्यता आहे. व्हायरल फुटेजमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, जर ही एखाद्याच्या पोटात गेली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. शिमला मिरचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओमागील सत्य समोर आले.

एका एक्स युजरने व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, "शिमला मिरची खाण्यापूर्वी काळजी घ्या. या क्लिपमध्ये कोणीतरी शिमला मिरची कापून पातळ, जवळजवळ धाग्यासारखी अळी काढताना दिसत आहे. हा एक अळी असल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला असून त्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम मोठ्या आतड्यावर होतो आणि एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो, असे या व्हिडिओत म्हटले आहे.

गूगलवर सर्च केल्यावर सोशल मीडियावर यापूर्वी शेअर केलेले असेच अनेक व्हिडिओ समोर आले. काही व्हिडिओंमध्ये ही अळी असल्याचा दावा केला जात आहे. तर, काहींच्या मते ही अळी नसून एक छोटा साप आहे. सर्चदरम्यान एएफपीने प्रसिद्ध केलेला एक अहवालही आम्हाला सापडला, ज्यात हे दावे खोटे ठरले आहेत. आउटलेटच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओमध्ये दाखवलेली अळी निरुपद्रवी आहे आणि यामुळे मानवाच्या आरोग्यास कोणताही धोका नाही. शिमला मिरचीच्या आतील अळीचा हा व्हिडिओ शेअर केला जात असून तो खाल्ल्यास मृत्यू होऊ शकतो, असा भ्रामक दावा केला जात आहे.

कॅडबरीमध्ये आढळली अळी

यापूर्वी सोशल मीडियावर चक्क कॅडबरीमध्ये अळी आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक्स युजर रॉबिन झॅचियसने चॉकलेट बारमधील अळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या दुकानातून त्याने वस्तू खरेदी केली, त्या दुकानातील पावतीचा फोटोही त्याने पोस्ट केला. या व्हिडिओला अवघ्या दोन दिवसांत ८७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले. या ट्विटला जवळपास ५०० लाईक्स मिळाले. या शेअरवर प्रतिक्रिया देताना लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

विभाग