स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहात? आता चिंता नको! truecaller ने आणले भन्नाट फीचर; आपोआप ब्लॉक होणार नकोसे कॉल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहात? आता चिंता नको! truecaller ने आणले भन्नाट फीचर; आपोआप ब्लॉक होणार नकोसे कॉल

स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहात? आता चिंता नको! truecaller ने आणले भन्नाट फीचर; आपोआप ब्लॉक होणार नकोसे कॉल

Mar 20, 2024 01:46 PM IST

Truecaller Spam call block app: ट्रू कॉलरने स्पॅमकॉल ची डोके दुखी थांबवण्यासाठी नवे भन्नाट फीचर आणले आहे. या मुळे नको असलेले कॉल आपोआप ब्लॉक होणार आहे.

ट्रू कॉलरने स्पॅमकॉल ची डोके दुखी थांबवण्यासाठी नवे भन्नाट फीचर आणले आहे. या मुळे नको असलेले कॉल आपोआप ब्लॉक होणार आहे.
ट्रू कॉलरने स्पॅमकॉल ची डोके दुखी थांबवण्यासाठी नवे भन्नाट फीचर आणले आहे. या मुळे नको असलेले कॉल आपोआप ब्लॉक होणार आहे.

Truecaller Spam call block app : एखाद्या मार्केटिंग ऑफरसाठी, लोन अथवा पैशाचे आमिष दाखविण्यासाठी सातत्याने येणारेस्पॅम कॉल हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरतात. अनेकदा याप्रकारच्या कॉलच्या फासात अडकून अनेक लोकांना आर्थिक नुकसान व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या स्पॅम कॉलपासून मुक्ती मिळावी यासाठी अनेक जण विविध प्रकारचे प्रयत्न करत असतात.

Raj Thackeray in Delhi : राज ठाकरे दिल्लीला रवाना; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?

ग्राहकांची ही गरज लक्षात घेत, Truecaller ने आपल्या प्रीमियम सदस्यांसाठी आणले स्पॅम कॉल ब्लॉकिंगचे उत्तम फीचर उपलब्ध करून दिले आहे. AI स्पॅम ब्लॉकिंग असे या नवीन फीचरचे नाव असून, हे ॲप कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असेल.

कंपनीने नुकतेच हे फीचर आपल्या प्रीमियम सदस्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये वापरकर्त्यांच्या फोनवर येणारे सर्व स्पॅम कॉल आपोआपच ब्लॉक केले जातील. सध्या AI स्पॅम ब्लॉकिंग. हे अपडेट फक्त Android डिव्हाइसेससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही सुविधा केवळ प्रीमियम सदस्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॉलर आयडी आणि स्पॅम ब्लॉकिंग ॲप युजर्ससाठी हे फीचर अतिशय उपयुक्त ठरत आहे.

Narendra Modi : अब की बार ४०० पार.. इतक्या जागा कशाला हव्यात?, पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

एवढा आहे सबस्क्रिप्शन चार्ज

नवीन फीचर बाबत अशीही शक्यता आहे की हे फीचर स्पॅम नसलेले कॉल्स देखील ब्लॉक करू शकतात. याबाबत कंपनीने सांगितले की, असे होणार नाही. या बाबत काळजी घेण्यासाठी आणि हे सुनिश्चित करण्यासाठी युजरचे इनपुट देखील घेतले जाणार आहे. हे फीचर खासकरून iOS साठी आणले जात आहे. कॉलर आयडी ॲप्सना स्पॅम कॉल्स आपोआप ब्लॉक करू देत नाही. टूकॉलरच्या या नव्या फीचरसाठी वापरकर्त्यांना प्रीमियम प्लॅनचे प्रीमियम सदस्यत्व घ्यावे लागणार आहे. या नंतर त्यांना ट्रू कॉलरच्या या नव्या फीचरचा लाभ घेता येणार आहे. Truecaller चे मासिक सदस्यता शुल्क भारतात ७५ रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या वार्षिक सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला ५२९ रुपये खर्च करावे लागणार आहेत.

ॲप अपडेट करणे आवश्यक

टूकॉलरच्या नव्या फीचरसाठी तुम्हाला या ॲपचे अपडेट १३.५८ अपडेट घ्यावे लागणार आहे. हे फीचर सुरू करण्यासाठी तुम्हाला ॲपच्या सेटिंग्जमध्ये दिलेल्या ब्लॉक पर्यायावर जावे लागेल. Truecaller ने काही आठवड्यांपूर्वी AI पॉवर कॉल रेकॉर्डिंग फीचर आणले होते. हे फीचर भारतीय यूजर्ससाठी तयार करण्यात आले आहे. कंपनी आयओएस तसेच अँड्रॉइड डिव्हाईससाठी खास ऑफर आणणार आहे. जेणेकरून या फीचरच्या मदतीने यूजर्स टूकॉलर ॲपमध्येच इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल रेकॉर्ड करू शकतात. या फीचरच्या मदतीने यूजर्स महत्त्वपूर्ण संभाषण रेकॉर्ड आणि सेव्ह देखील करू शकणार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर