truck hits bus in assam 12 passengers killed : आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात तब्बल ४५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाने भरलेल्या ट्रकने समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात पाच महिला आणि एका अल्पवयीन मुलासह १२ जण ठार झाले आहे, ही घटना राष्ट्रीय महामार्ग ३७ वर डेरगाव येथे आज पहाटे ५ वाजता घडली.
मिळालेल्या महितीनुसार आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात सुमारे ४५ जणांनी भरलेली बस गोलाघाटहून तिनसुकियाच्या दिशेने जात होती. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाने भरलेल्या ट्रकने या बसला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भयंकर होता की, यात ट्रक आणि बसच्या दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. तर बस मधील १२ प्रवाशांचा देखील मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी तातडीने जखमींना डेरगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले. गंभीर जखमींना जोरहाट वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जेएमसीएच) भरती करण्यात आले आहे.
गोलाघाटचे उपायुक्त पी. उदय प्रवीण म्हणाले, "राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूने रस्त्याची दुरुस्ती सुरू होती आणि त्यामुळे दोन्ही दिशांची वाहने दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने जात होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ट्रक सुसाट वेगाने येत होता. बसमधील बहुतांश प्रवासी भारलुखुवा गावातील होते. ते तीनसुकिया येथील तिलिंगा मंदिरात जात होते. तेथून ते बोगीबील येथे पिकनिकला जात होते. यावेळी हा अपघात झाला.
गोलाघाटचे पोलिस अधीक्षक राजेन सिंह म्हणाले, आम्ही बस आणि ट्रकमधून १० मृतदेह बाहेर काढले आहेत. जेएमसीएचमध्ये दाखल झालेल्या २७ जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला. बेदरकारपणे आणि बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे आपघतास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या