Hit and Run Law Protest: देशभरातील ट्रक चालकांचा संप अखेर मागे, 'हिट अँड रन' कायद्यासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय-truck drivers protest drivers strike finally over hit and run law will not apply for now say union home secretary ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hit and Run Law Protest: देशभरातील ट्रक चालकांचा संप अखेर मागे, 'हिट अँड रन' कायद्यासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

Hit and Run Law Protest: देशभरातील ट्रक चालकांचा संप अखेर मागे, 'हिट अँड रन' कायद्यासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

Jan 02, 2024 10:51 PM IST

Truck Drivers Protest : ट्रक चालकांच्या विरोधानंतर केंद्र सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. यानंतर ट्रक चालकांनी आपला संप मागे घेतला आहे.

Hit and Run Law Protest
Hit and Run Law Protest

केंद्र सरकारच्या नव्या मोटर वाहन कायद्यांविरोधात संपावर गेलेल्या मोटर ट्रान्सपोर्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्यासोबत महत्वाचीबैठक पार पडली. नवीन कायद्यातील हिट अँड रन साठी कठोर शिक्षेला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस विरोध करत आहेत. ट्रक चालकांच्या विरोधानंतर केंद्र सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. यानंतर ट्रक चालकांनी आपला संप मागे घेतला आहे. यामुळे उद्यापासून पेट्रोल-डिझेलसह सर्व मालाची वाहतूक सुरुळीत होणार आहे.

हिट अँड रन' कायद्यात केलेल्या (Motor Vehicles Act) बदलांविरोधात देशभरात ट्रक व टँकर चालकांनी दोन दिवसापासून संप पुकारला होता. या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील पेट्रोल पंपावर लोकांची गर्दी झाली होती. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासमवेत राष्ट्रीय परिवहन संघटनेची बैठकपार पडली. यावेळी सरकारकडून कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगितीचे आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने संप मागे घेण्याचे मान्य केले आहे.

वाहतूक संघटनेच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले की, नवीन कायद्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. भारतीय न्यायिक संहितेचे कलम १०६/२ लागू करण्यापूर्वी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसला सांगितले जाईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.त्यांनी राष्ट्रीय परिवहन संघटनेला संप मागे घेण्याचे आवाहन केले.

या नव्या कायद्याची सध्या अंमलबजावणी होणार नसून ज्यावेळी त्याची अंमलबजावणी होईल, त्या वेळी संघटनेशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन संघटनेला सरकारकडून देण्यात आले आहे. यानंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

Whats_app_banner
विभाग