मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Firing In Kansas : कुत्र्यानं रायफलवर पाय ठेवला अन् गोळीबार झाला; ट्रकचालकाचा घटनास्थळीच मृत्यू

Firing In Kansas : कुत्र्यानं रायफलवर पाय ठेवला अन् गोळीबार झाला; ट्रकचालकाचा घटनास्थळीच मृत्यू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 25, 2023 03:23 PM IST

Firing In Kansas America : रायफल मागे ठेवून तरुण पुढच्या सीटवर बसलेला होता. परंतु मागच्या सीटवर बसलेल्या कुत्र्याचा पाय रायफलच्या ट्रीगरवर पडल्यानं वाहनात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

Firing By Dog In Kansas America
Firing By Dog In Kansas America (HT_PRINT)

Firing By Dog In Kansas America : कुत्र्यानं रायफलवर पाय ठेवल्यानं झालेल्या गोळीबारात ट्रकचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील कंसास शहरातील ही घटना घडली असून तरुण आपल्या कुत्र्याला घेऊ ट्रकमधून प्रवास करत होता. या घटनेमुळं अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. टीम असं मृत तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याचा ट्रक ताब्यात घेतला आहे. कुत्र्यानं रायफलवर पाय ठेवल्यानं तरुणाच्या पाठीत गोळी लागली. त्यानंतर त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील कंसास शहरात एक ट्रकचालक आपल्या कुत्र्याला मागच्या सीटवर बसून प्रवास करत होता. त्यावेळी त्यानं सोबत असलेली रायफल मागच्या सीटवर ठेवली. त्यानंतर मागच्या सीटवरील कुत्र्यानं रायफलच्या ट्रीगरवर पाय ठेवल्यामुळं गोळीबार झाला. रायफलीतून सुटलेली गोळी पुढच्या सीटवर बसलेल्या तरुणाच्या पाठीत लागली. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिकांना समजताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत तरुणाला ट्रकमधून बाहेर काढलं. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वीच चीनी नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या दक्षिण आशियाई नागरिकांवर अमेरिकेत गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यात १० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ट्रकमधील रायफलवर कुत्र्यानं पाय ठेवल्यानं झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

WhatsApp channel