पाकिस्तानमधील कराची शहरातील केमारी परिसरात एका रहस्यमय आजाराने आतापर्यंत १४ मुलांसह १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे आरोग्य अधिकारी अजूनपर्यंत या मृत्यूच्या कारणांचा शोध घेऊ शकलेले नाहीत. आरोग्य विभागाचे संचालक अब्दुल हमीद जुमानी यांनी शुक्रवार सांगितले की, केमारीमधील मावाच गोथ परिसरात १० ते २५ जानेवारी दरम्यान अज्ञात आजारने १८ लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये १४ लहान मुलांचा समावेश आहे. अब्दुल हमीद जुमानी यांनी म्हटले की, या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक काम करत आहे. मात्र आम्हाला संशय आहे की, हा आजार समुद्र किंवा पाण्याशी संबंधित आहे. कारण जेथे मृत्यू झाले आहेत. ते गाव समुद्रकिनाऱ्यावर आहे.
मावाच गोथ एक झोपडपट्टी परिसर असून येथे मजूर व मच्छिमार लोक राहतात. जुमानी यांनी सांगितले की, मृतांच्या कुटूंबीयांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी त्यांना ताप, गळ्याला सूज व श्वास घेण्यास त्रास होत होता.
Mahavitran : काय आहे रूफ टॉप सोलर योजना? गाठली १,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता
अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही लोकांनी तक्रार केली आहे की, मागील दोन आठवड्यापासून परिसरात एक वेगळात वास येत आहे. केमारीचे उपायुक्त मुख्तार अली अब्रो यांनी सांगितले की, याप्रकरणी त्यांनी एक फॅक्टरी मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आम्ही राज्यातील पर्यापरण संबंधित काम करणाऱ्या संस्थांना बोलावले होते त्यांनी येथी तीन फॅक्टरीचे नमुने गोळा करून नेले आहेत.
सिंध केंद्र (रासायनिक विज्ञान) चे प्रमुख इकबाल चौधरी यांनी म्हटले की, फॅक्टरीमधून सोयाबीनचे काही नमुने जमा केले असून मृत्यूचे कारण सोया एलर्जीही असू शकते. त्यांनी म्हटले की, हवेत सोयाबीनेचे कण गंभीर आजार व मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात. चौधरी यांनी म्हटले की, अजूनपर्यंत आम्ही कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचलो नाही, नमुन्यांची तपासणी केली जात आहे.