मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  न्याय देणाराच निघाला भक्ष्यक! न्यायाच्या आशेने गेलेल्या बलात्कार पीडितेवर न्यायाधीशांनी केला लैंगिक अत्याचार

न्याय देणाराच निघाला भक्ष्यक! न्यायाच्या आशेने गेलेल्या बलात्कार पीडितेवर न्यायाधीशांनी केला लैंगिक अत्याचार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 19, 2024 06:26 AM IST

magistrate sexually assaulted rape victim : न्याय मागण्यासाठी न्यायाधीशाकडे गेलेल्या बलात्कार पीडितेवर न्यायाधीशानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना त्रिपुरा येथे घडली आहे.

magistrate sexually assaulted rape victim
magistrate sexually assaulted rape victim (HT_PRINT)

magistrate sexually assaulted rape victim : न्याय मागण्यासाठी न्यायाधीशाकडे गेलेल्या बलात्कार पीडितेवर न्यायाधीशानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना त्रिपुरा येथे घडली आहे. बलात्कार पीडितेने न्यायदंडाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत कोर्टातील चेंबरमध्ये मॅजिस्ट्रेटने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने म्हटले आहे.  एका वरिष्ठ वकिलाच्या म्हणण्यानुसार, धलाई जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गौतम सरकार यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय समितीने या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. पीडित महिलेने सांगितले की, लैंगिक शोषणाची घटना १६ फेब्रुवारीला घडली. बलात्कार प्रकरणातील जबाब नोंदवण्यासाठी ती कमालपूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये गेली होती.

Pune Crime news : पुण्यात तरुणांनी घरातच छापल्या बनावट नोटा; दोघांना अटक, १ लाख २० हजारांच्या नोटा जप्त

याबाबत पीडित महिलेने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे तक्रार केली आहे. त्यात म्हटले आहे की, 'मी १६ फेब्रुवारी रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या चेंबरमध्ये माझा जबाब नोंदवण्यासाठी गेले होते. मी माझे म्हणणे मांडणार असताना न्यायमूर्तींनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यामुळे मी घाबरून त्यांच्या चेंबरमधून बाहेर पडले. या प्रकाराची माहिती मी वकील आणि माझ्या पतीला दिली. या घटनेबाबत महिलेच्या पतीने कमालपूर बार असोसिएशनकडे तक्रारही केली आहे.

chandrayaan 4 : चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर आता इस्रो चंद्रावरून माती आणण्याच्या तयारीत

तपासासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना

पीडितेच्या तक्रारीवरून जिल्हा व सत्र न्यायाधीश गौतम सरकार यांच्यासह मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यजित दास यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, कमालपूर यांच्या कार्यालयात घडलेल्या या घृणास्पद प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. या साठी त्यांनी येथे भेट देखील दिली. वकिल संस्थेचे सचिव शिबेंद्र दासगुप्ता म्हणाले, 'जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने कमालपूर बार असोसिएशनच्या सदस्यांचीही न्यायालयाच्या आवारात भेट घेतली. यावेळी महिलेच्या आरोपांवर आमचा दृष्टिकोन विचारण्यात आला. समितीसमोर आम्ही आमचे म्हणणे मांडले.

सोशल मिडियावर या प्रकरणाची चर्चा

न्यायमूर्तींवर करण्यात आलेल्या आरोपांवर त्रिपुरा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल व्ही. पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'या प्रकरणी अद्याप आमच्याकडे कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही. राज्यातील इतर लोकांप्रमाणे मलाही मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती मिळाली. आम्हाला योग्य स्वरुपात तक्रार प्राप्त झाल्यावर आम्ही निश्चितपणे योग्य ती कारवाई करू. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा होत असून लोकांनी याचा तीव्र निषेध केला आहे. अशा परिस्थितीत पीडितेला न्याय कसा मिळणार, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग