Viral News: आपण सुंदर दिसावे ही प्रत्येकाची इच्छा असते. सुंदर दिसण्यासाठी काहीजण आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी देखील करतात. अशीच एक बातमी समोर आली आहे. एका ६३ वर्षीय महिलेने सुंदर दिसण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. या महिलेला तिच्या मुलीपेक्षा जास्त सुंदर दिसायचे आहे, असे तिने सांगितले आहे.
सारा बर्गे असे या महिलेचे नाव असून ती स्पेनमधील रहिवासी आहे. सुंदर दिसण्यासाठी ती नियमितपणे ब्युटी पार्लरमध्ये जाते आणि आतापर्यंत तिने अनेक शस्त्रक्रियाही केल्या आहेत. सारा तिच्या पतीसोबत राहते. महत्त्वाचे म्हणजे, तिला स्वत:च्या मुलीपेक्षाही सुंदर दिसायचे आहे. तिने गेल्या काही वर्षात चेहऱ्यासाठी जवळपास ६ कोटी रुपये खर्च केल्याचे समजत आहे.
साराने सांगितले की मला सर्जरीचे व्यसन आहे. एकदा का तुम्हाला सुंदर दिसण्याची आवड निर्माण झाली की, तुम्ही कधीही थांबू इच्छित नाही. सारा म्हणते की, ती दर १५ दिवसांनी बोटॉक्स किंवा फिलर इंजेक्शन घेते. डॉक्टर असल्यामुळे मला सूट मिळाली. नाहीतर तिला प्लास्टिक सर्जरीसाठी ६ कोटींपेक्षा अधिक खर्च करावा लागला. साराला कंपनीकडून एक व्हाउचर मिळायचे, ज्याचा वापर ती शस्त्रक्रिया करण्यासाठी करत असे. साराने आतापर्यंत ब्रेस्ट लिफ्ट, हिप इम्प्लांटपासून फेस लिफ्टपर्यंत सर्व काही केले.
मात्र, आता या महिलेने स्पष्ट केले आहे की, तिच्या सुंदर दिसण्याचा हा ट्रेंड तिच्या मृत्युपर्यंत कायम राहणार आहे. सुंदर दिसण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर वापरतात. मी कोणत्याही प्रकारचे फिल्टर वापरत नाही, मी जसी आहे तसीच दिसते, असेही सारा म्हणाले.
उत्तर प्रदेशातील मऊ येथून एक धक्कादायक घटना समोर आली. येथे एका सासऱ्याने आपल्याच सुनेसह पळून जाऊन लग्न केले. या दोघांसह अनेक ग्रामस्थही मंदिरात पोहोचले आणि या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे प्रकरण मढच्या घोसी कोतवाली येथील सराई गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासऱ्याचे वय ७० वर्षे आहे. तर, त्याची सून ३५ वर्षाची आहे. हरिशंकर असे या वृद्धाचे नाव असून तो सराई गावचे कोतेदार आहेत. हरिशंकरला पाच मुलगे असून ते आपल्या मोठ्या मुलाच्या पत्नीच्या प्रेमात कधी पडले, हे कोणालाच कळले नाही. दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि घरातून पळून गेले. सुनेला दोन मुलंही असल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या