Uttar Pradesh Trending News: उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी माहिती समोर आली. गंगानगरमध्ये सेल्फी काढण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढणाऱ्या तरुणींनी संपूर्ण जिल्ह्यातील पोलिसांना घाबरून सोडले. या तरुणी आत्महत्या करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढल्या, असे आजुबाजूच्या लोकांना वाटले. त्यांनी याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानंतर संपूर्ण जिल्ह्याचा फौजफाटा तरुणींना वाचवण्यासाठी गंगानगरच्या दिशेने धावला. परंतु, पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तरुणी सेल्फी काढून पाण्याच्या टाकीवरून खाली उतरल्या.
गंगानगरमधील रक्षापुरम कॉलनीत असलेल्या एमडीए पार्कमध्ये पाण्याची टाकी आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास तीन तरुणी या टाकीवर चढल्या. बराच वेळ त्या तरुणी तिथेच थांबल्या. आजूबाजूला उपस्थित असलेल्या काही लोकांनी तरुणींना टाकीवर पाहून १०० नंबरवर पोलिसांना फोन केला. पाण्याच्या टाकीवर तीन तरुणी चढल्या असून त्या आत्महत्या करू शकतात, अशी शक्यता आहे, अशी माहिती स्थानिकांनी पोलिसांना सांगितली.
लोकांनी विचारपूस केली असता धक्कादायक माहिती उघड
या माहितीनंतर शहरातील अनेक पोलीस ठाण्यांचे दल आणि यूपी १०० वाहने रक्षापुरमच्या दिशेने रवाना झाली. काही लोकांनी टाकीगाठून तरुणींना खाली उतरण्याची विनंती केली, पण त्या तिथेच थाबल्या. सुमारे अर्ध्या तासानंतर तरुणी खाली आल्या. लोकांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी सेल्फी काढण्यासाठी टाकीवर चढल्याचे सांगितले. हे ऐकून नागरिक आश्चर्यचकीत झाले.
पोलीसही चक्रावले
याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनाास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत या तरुणी निघून गेल्या होत्या. यासंदर्भात पोलिसांनी आजुबाजूच्या लोकांकडे विचारपूस केली असता त्या सेल्फी काढण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती देऊन फौजफाटा माघारी पाठवण्यात आला.
उत्तर प्रेदश: तरुणाला ३० दिवसांत ५ वेळा सर्पदंश
उत्तरप्रदेश राज्यातील फतेहपूर सौरा गावातील तरुणाला सापाने पाच वेळा सर्पदंश केल्याचा प्रकार समोर आला. विकास दुबे (वय, २४) असे पीडित तरुणाचे नाव आहे. विकास दर आठवड्याला साप चावतो. त्यानंतर उपचार घेऊन तो बरा होतो. विकास मावशीच्या घरी रहायला गेला, पण तेथेही सापाने त्याला दंश केला. मागील ३० दिवसांत त्याला ५ वेळा सापाने दंश केला. मिळालेल्या माहितीनुसार, विकासला २ जून रोजी रात्री ९ वाजता सापाने दंश केला. यानंतर कुटुंबाने त्याला जवळच्या रुग्णालयात पाठवले. जिथे दोन दिवसांचा उपचार घेऊन तो घरी परतला. दरम्यान, १० जूनला देखील त्याला सापाने दंश केले. या घटनेला आठवडा पूर्ण होत नाही तोच सापाने त्याला पु्न्हा दंश केला. त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा साप त्याला चावला. यावर उपचार घेऊन घरी परतला आणि मावशीच्या घरी राहायला गेला. पण तिथेही मागच्या शुक्रवारी त्याला सापाने संश केला
संबंधित बातम्या