Online Frauds: ऑनलाइन व्यवहारसह ऑनलाइन फसवणुकीच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार नागरिकांना नोकरी, बक्षीस, लॉटरी यांसारख्या गोष्टींचे आमिष दाखवून त्यांनी काबाड कष्ट करून कमवलेला पैसा झटक्यात गायब करत आहेत. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. सायबर गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी काय करावे आणि चुकून आपण सायबर गु्न्हेगाराच्या जाळ्यात अडकलात, मग अशावेळी काय केले पाहिजे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
बँकेच्या कस्टमर केअर संपर्क साधायचा असल्यास तो अधिकृत आहे की नाही? याची खात्री करून घ्यावी. काहीजण इंटरनेटवरून आपल्या बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर शोधतात. पंरतु, असे करणे एखाद्याच्या अंगलट येऊ शकते.
सायबर फसवणूक झाल्यास त्वरीत बँक किंवा नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइनवर (डायल १९३०) तक्रार नोंदवावी. तसेच नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल किंवा जवळच्या पोलीस स्थानकात फसवणुकीची फिर्याद द्यावी. तक्रारीची प्रत सोबत ठेवावी.
सायबर फसवणूक झाल्यानंतर म्हणजेच आपल्या खात्यातून पैसे गायब झाल्यानंतर अनेकजण गोंधळून जातात. परंतु, फसवणूक झाल्याचा संशय येताच सर्व माहिती आणि डॉक्यूमेंट्स ताडबतोब सेव्ह करून ठेवा, संवाद रेकॉर्ड करा, स्क्रिनशॉट्स काढा, मेसेज कॉपी करून ठेवा. यामुळे सायबर गुन्हेगारांचा तपास करणे, सोपे जाईल.
साबयर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी सातत्याने आपले पासवर्ड बदलत राहणे आवश्यक आहे. आपल्या डिवाईसमध्ये टू स्टेप्स व्हेरिफिकेशन्स, टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन आणि अॅण्टी-मालवेअर इन्स्टॉल करा, जे आपला मोबाईल किंवा लॅपटॉप स्कॅन करा. याशिवाय, आरबीआयने ऑनलाइन व्यवहारांसाठी अनिवार्य केलेले टोकनायझेशनसारखे पर्याय निवडा.
डिजिटल घोटाळ्यांबाबत नेहमीच आपले मित्र, कुटुंब, प्रौढ व्यक्तींशी चर्चा करा. तसेच आपल्या माहिती असलेल्या काही गोष्टी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा.तसेच सोशल मीडियावर डिजिटल घोटाळ्यांबाबत आपला अनुभव शेअर करा. यामुळे आणखी कोणाची फसवणूक होण्यापासून टाळता येऊ शकते.