transgender man got pregnant : एक ट्रान्सजेंडर व्यक्ति गरोदर राहिल्याची एक विचित्र घटना पुढे आली आहे. हा व्यक्ति लिंग बदलशस्त्रक्रिया करण्यासाठी दवाखान्यात गेला होता. यावेळी त्यांची तपासणी करत असतांना तो गेल्या पाच महिन्यांपासून गरोदर असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी त्यांना लिंग बदल करण्याची शस्त्रक्रिया थांबवण्याचा सल्ला दिला आहे. ही घटना युरोपियन देश इटली येथे घडली आहे. इटलीतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.
या दुर्मिळ घटनेला "सीहॉर्स डॅड्स" म्हणतात. सीहॉर्स हा नर मासा आहे. हा प्राणी जगभर ओळखला जातो, कारण हा नर मासा पिल्लांना जन्म देतो. यामध्ये मादी आपली अंडी नर मशाच्या तोंडात असलेल्या एका थैलीत ठेवते. यातूनच "सीहॉर्स डॅड्स" ची संकल्पना उदयास आली आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मार्को नावाचा एक ट्रान्सजेंडर पुरुष हा ब्रेस्ट रिमूव्हल सर्जरी करून लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेला होता. यावेळी तपासणीत तो पाच महिन्यांचा गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. मार्कोची रोममधील रुग्णालयात स्तनदाहाची शस्त्रक्रिया झाली, असे अहवालात म्हटले आहे. मास्टेक्टॉमी ही स्तन काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया त्याच्यावर करण्यात येणार होती.
ही व्यक्ति गर्भाशय काढून टाकणारी हिस्टेरेक्टॉमी शास्त्रक्रियेची तयारी करत होता. यात गर्भाशय शरीरातून काढून टाकले जाते. मात्र, तो गरोदर असल्याने डॉक्टरांनी गर्भाशय न काढण्याचा सल्ला दिला. ला रिपब्लिका, सेम (इटली) येथून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिक वृत्तपत्रात त्याच्या बाबत वृत्त देण्यात आले आहे. ट्रान्सजेंडर मार्को आपल्या मुलाचा जैविक बाप आणिआई होणार असल्याचे यात म्हटले आहे.
डॉक्टरांनी मार्कोला त्याची हार्मोन थेरपी देखील थांवण्याचे सांगितले आहे. एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. जिउलिया सेनोफॉन्टे यांनी सांगितले की, मार्कोची हार्मोन थेरपी ताबडतोब बंद करावी लागणार आहे. अन्यथा त्याच्या गर्भाला धोका होऊ शकतो. गर्भधारणेच्या काही महिन्यानंतर ही शस्त्रक्रिया केल्यास गंभीर परिमाण होऊ शकतात. परिणामी मृत्यूही ओढवू शकतो असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
डॉक्टर म्हणाले की हार्मोन थेरपी ही केवळ मासिक पाळी थांबवण्यासाठी केली जाते. यामुळे गर्भधारणा टाळता येते याची देखील शाश्वती नसते. हार्मोन थेरपी घेणारी व्यक्ती देखील गर्भवती राहू शकते. ते म्हणाले की, लिंग बदल घडवून आणणारे लोक उपचारादरम्यान सांगितलेल्या गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करून गर्भधारणा टाळू शकतात.