मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Odisha train accident: ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांचा आकडा २३३ वर, ९०० जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Odisha train accident: ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांचा आकडा २३३ वर, ९०० जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 03, 2023 07:06 AM IST

Coromandel Express Accident : हावडा ते चेन्नई धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वेचा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० लोक जखमी झाले आहेत.

Coromandel Express derails
Coromandel Express derails

Coromandel Express derails : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले आणि दुसर्‍या रुळावर येणाऱ्या ट्रेनला धडकले. पीटीआय या वृत्तसंस्थेने रात्री उशिरा जारी केलेल्या अपडेटनुसार, या अपघातात आतापर्यंत २३३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कोमल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना संध्याकाळी ७.२० च्या सुमारास बहनमा स्थानकावर हा अपघात झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाती मदत गाड्या अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातानंतर तातडीने बचाव मोहीम राबवून ३०० प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

 

हावडा ते चेन्नई धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वेचा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओडिशा राज्यातील बालासोरपासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. कोरोमंडल ट्रेन एका मालगाडीला धडकली. मालगाडीला धडकल्यानंतर स्लीपरचे ३ कोच सोडून अन्य डबे रुळावरून खाली उतरले. प्राथमिक माहितीनुसार एक्सप्रेसचे १८ डबे रुळावरून घसरले.

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या कोचमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकले आहेत. स्थानिक लोकांकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकाता येथील शालीमार रेल्वे स्टेशन दरम्यान धावते. शुक्रवारी सायंकाळी कोरोमंडल एक्सप्रेस ओडिशा राज्यातील बालासोरजवळ एका मालगाडीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, एक्सप्रेसचे १८ डबे रुळावरून खाली उतरले.

Vande Bharat : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा शनिवारी होणार लोकार्पण सोहळा अखेरच्या क्षणी रद्द

या अपघातात आतापर्यंत तब्बल २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले आहेट. आपघाताची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. एकाच मार्गावरून दोन गाड्या विरुद्ध दिशेने आल्याने हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार सिग्नल यंत्रणा खराब झाल्यामुळे दोन ट्रेन एकाच रुळावरून आल्या व त्यांच्या भीषण टक्कर झाली.

नांदेड हादरलं.. वरातीत नाचण्यावरून दोन गटात राडा; तरुणाची हत्या, ९ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्री म्हणाले की, 'अपघात दुर्दैवी होता, आणि त्यांच्या मंत्रालयाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच बचावकार्य सुरू झाले.' एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि अग्निशमन विभागाच्या पथकांना बचावासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले.

WhatsApp channel

विभाग