Kanchanjungha Express accident in Bangal : पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक बसली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्या होत्या, त्यामुळे हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय २०० पैकी 60 जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. कांचनजंगा एक्सप्रेस सियालदहच्या दिशेने जात होती. त्यानंतर मालगाडीने मागून धडक दिली. त्यामुळे पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या रेल्वेत अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
कटिहार विभागातील रंगपानी आणि निजबारी स्थानकादरम्यान स्थानकावर उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिली. ही धडक ऐवढी भयंकर होती की, कांचनजंगा एक्स्प्रेसच्या सुमारे तीन बोगी रुळावरून घसरल्या. तर काही बोगी हा मालगाडीच्या इंजिनावर चढल्या, तर एक बोगी दुसऱ्या बोगीवर चढली. या घटनेची माहिती मिळताच कटिहार रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. कटिहार आणि एनजेपी येथून अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल व्हॅनसह रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेत २०० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला? याची अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र घटनास्थळावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत काही प्रवाशाचा जीव गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सियालदहला जाणारी कांचनजंगा एक्स्प्रेस रंगपानी स्टेशनवर उभी होती, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाठीमागून आलेल्या मालगाडीने धडक दिल्याने गार्ड बोगी व एसएलआर तसेच इतर काही बोगींचे मोठे नुकसान झाले. रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. त्यामुळे शेकडो लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे यांनी या घटनेला दुजोरा दिला. सध्या किती जखमी आहेत, असा सवाल त्यांनी केला. हे समोर आलेले नाही. या घटनेत किती प्रवाशांचा मृत्यू झाला? हे देखील कळू शकले नाही. मंडळ आणि एनजेपीचे अनेक वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वरिष्ठ डीसीएम धीरज चंद्र कलिता यांनी सांगितले की, अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि वैद्यकीय वाहन रवाना झाले आहे.
संबंधित बातम्या