आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यातील दिबालोंग स्थानकात आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. ईशान्य सरहद्द रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी झालेल्या या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रुळावरून घसरलेल्या डब्यांमध्ये पॉवर कार (जनरेटर पार्ट) आणि ट्रेनच्या इंजिनचा समावेश आहे.
बचाव आणि पुनर्वसनाच्या कामाची पाहणी करण्यासाठी लुमडिंगयेथून अपघात मदत वैद्यकीय ट्रेन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अपघातस्थळी रवाना झाली आहे. लुमडिंग-बदरपूर सिंगल लाइन डोंगराळ मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
रेल्वेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, लुमडिंग विभागातील लुमडिंग-बरदरपूर टेकडी भागात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. लुमडिंग-बदरपूर सिंगल लाइन मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. बचाव आणि पुनर्वसन कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अपघात मदत ट्रेन आणि अपघात मदत वैद्यकीय ट्रेन लुमडिंगहून अपघातस्थळी रवाना झाली आहे.
रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटनेनंतर रेल्वेने लुमडिंगमध्ये हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. 03674 263120, 03674 हे हेल्पलाईन क्रमांक 263126