Bathinda Bus Accident : नाल्यामध्ये बस कोसळून भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू , २० जण जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bathinda Bus Accident : नाल्यामध्ये बस कोसळून भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू , २० जण जखमी

Bathinda Bus Accident : नाल्यामध्ये बस कोसळून भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू , २० जण जखमी

Dec 27, 2024 07:36 PM IST

Road Accident : बठिंडामध्ये पावसामुळे खासगी कंपनीची बस रस्त्यावरून घसरून नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील नेमके किती लोक होते, हे समजू शकलेले नाही.

बस नाल्यात कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू
बस नाल्यात कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू

पंजाबमधील भटिंडा येथे खाजगी कंपनीच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जखमी झाले आहेत. ५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून बस घाण पाण्याच्या नाल्यात कोसळली. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.

बठिंडा जिल्ह्यात सरदुलगड-बठिंडा रस्त्यावर पावसामुळे एक बस रस्त्यावरून घसरून घाणेरड्या नाल्यात कोसळली. या अपघातात ५  जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना वाचविण्यास सुरुवात केली. काही वेळाने एनडीआरएफचे पथकही तेथे पोहोचले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान आणखी ३ जणांचा मृत्यू झाला.

बठिंडाचे आमदार जगरूप सिंह गिल यांनी सांगितले की, या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर शहीद भाई मणिसिंह रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्ण लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस पडत होता. बस नाल्यात पडण्यापूर्वी पुलावरील रेलिंगला आदळली आणि नंतर थेट नाल्यातकोसळली. आम्ही घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही लोकांना वाचवले पण पावसामुळे कामात खूप व्यत्यय निर्माण झाला होता. काही वेळाने एनडीआरएफचे पथक तेथे आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातानंतर बुडालेल्या लोकांना गावकऱ्यांनी मदत केली. गावकऱ्यांना अनेकांना मदत करण्यात यश आल्याची माहिती उपायुक्त शौकत अहमद पारे यांनी दिली. स्थानिक लोक तत्काळ घटनास्थळी पोहोचले नसते तर मृतांचा आकडा अधिक असू शकला असता. बसमधील किती लोक आहेत याची पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही. आम्ही क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढली आहे. बस नाल्यात कशी पडली आणि कशामुळे झाली याचा तपास सुरू आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर