धक्कादायक! मेडिकल कॉलेजच्या शिशुवॉर्डला लागली भीषण आग! १० नवजात बालकं होरपळून ठार; १६ गंभीर जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक! मेडिकल कॉलेजच्या शिशुवॉर्डला लागली भीषण आग! १० नवजात बालकं होरपळून ठार; १६ गंभीर जखमी

धक्कादायक! मेडिकल कॉलेजच्या शिशुवॉर्डला लागली भीषण आग! १० नवजात बालकं होरपळून ठार; १६ गंभीर जखमी

Nov 16, 2024 07:26 AM IST

Jhansi medical college fire incident : उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये शुक्रवारी रात्री एक वेदनादायक घटना घडली. येथील मेडिकल कॉलेजच्या शिशु उपचार विभागाला अचानक लागलेल्या आगीत १० नवजात मुलांचा मृत्यू झाला.

मेडिकल कॉलेजच्या शिशुवॉर्डला लागली भीषण आग! १० नवजात बालकं होरपळून ठार; १६ गंभीर जखमी
मेडिकल कॉलेजच्या शिशुवॉर्डला लागली भीषण आग! १० नवजात बालकं होरपळून ठार; १६ गंभीर जखमी

Jhansi medical college fire incident : यूपीच्या झाशीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या एसएनसीयू वॉर्डला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तर १६ बालकं गंभीर जखमी झाली आहेत. या विभागाचे दरवाजे आणि खिडक्या तोडून तब्बल ३७ मुलांना बाहेर काढण्यात आलं आहे. या घटनेत १६ मुलं  भाजल्याची माहिती आहे. या सर्वांवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतर वॉर्डमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. एडीजी कानपूर आलोक सिंह यांनी दहा मुलांचा मृत्यू आणि ३७ मुलांची वाचवण्यात आल्याच्या वृत्ताला  दुजोरा दिला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास ही आग लागली. कर्मचाऱ्यांना काही समजेपर्यंत आग चांगलीच भडकली. संपूर्ण वॉर्ड धुराने भरला होता. मुलांच्या आईवडिलांनी आणि दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी  आरडाओरडा करत मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.  वैद्यकीय महाविद्यालयाची अग्निशामक यंत्रणा देखील यावेळी फोल ठरली.  अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत १० जीवंत मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता.  दरवाजे- खिडक्या तोडून ३७ मुलांना कसे बसे  बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील बहुतेकांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नवजात बालकांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.  वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे फोन बंद असून कुणी बोलण्यास तयार नाहीत.  

आग कशी लागली याचे कारण अस्पष्ट 

मेडिकल कॉलेजच्या एनआयसीयू विभागाला आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग विजेच्या ओव्हरलोडिंगमुळे लागली असण्याची प्राथमिक शक्यता आहे. तर येथील ऑक्सीजन  सिलिंडर फुटल्यामुले ही आग लागली असल्याचे काहींचे म्हणणे आहे.  अग्निशमन दलासह लष्कराचे अग्निशमन पथक देखील  घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. वॉर्डात ४७ मुले होती, त्यापैकी १० मुलांचा मृत्यू झाला असून ३७ मुलांना बाहेर काढण्यात आलं आहे.  वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील  वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, एसएसपींसह अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य करत आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या वॉर्डात धूर पसरला असून त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळा येत होता.  

 फायर अलार्म यंत्रणा फेल

 मेडिकल कॉलेजमधील फायर अलार्म यंत्रणा फेल ठरल्याची पुढे आली आहे. आग लागली तरी फायर अलार्म वाजला नाही. हा अलार्म वाजला असता, तर तातडीने बचाव कार्य राबवले जाऊ शकले असते. व एवढी मोठी दुर्घटना टळली नसती, असे बोलले जात आहे. त्याचबरोबर वॉर्डातील अग्निसुरक्षा उपकरणांचाही काहीच उपयोग झाला नाही. कानपूरचे एडीजी आलोक सिंह यांनी सांगितले की, झाशी मेडिकल कॉलेजच्या बालरोग विभागात लागलेल्या आगीत १० मुलांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर  ३७ मुलांना वाचवण्यात आलं आहे.  आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे  कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले घटनेच्या चौकशीचे आदेश 

मेडिकल कॉलेजला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांच्या मृत्यूच्या बातमीमुले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील हळहळले. त्यांनी या घटनेबद्दल  दु:ख व्यक्त करत, सोशल मीडिया एक्सवर लिहिले की, "झाशी मेडिकल कॉलेजच्या एनआयसीयूमध्ये झालेल्या अपघातात मुलांचा मृत्यू अत्यंत दु:खद आणि हृदयद्रावक आहे. मदत व बचावकार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना की, दिवंगत आत्म्याला मोक्ष मिळावा आणि जखमीं मुले लवकर बरे व्हावी. आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर